तामिळनाडूत आता ‘अम्मा मेडिकल शॉप’

By Admin | Updated: June 27, 2014 01:50 IST2014-06-27T01:50:56+5:302014-06-27T01:50:56+5:30

तामिळी जनतेला योग्य दर्जाची व वाजवी किमतीची औषधे मिळावीत यासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी चेन्नईत अम्मा मेडिकल शॉप या नावाच्या औषधांच्या 1क् दुकानांचे उद्घाटन आज केले.

'Amma Medical Shop' now in Tamil Nadu | तामिळनाडूत आता ‘अम्मा मेडिकल शॉप’

तामिळनाडूत आता ‘अम्मा मेडिकल शॉप’

>चेन्नई : तामिळी जनतेला योग्य दर्जाची व वाजवी किमतीची औषधे मिळावीत यासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी चेन्नईत अम्मा मेडिकल शॉप या नावाच्या औषधांच्या 1क् दुकानांचे उद्घाटन आज केले. 
चेन्नईसह इरोड, सालेम, चुडुलोरे, मदुराई, शिवगंगा व विरुधुनगर या जिल्ह्यांमधील औषधांच्या दुकानांचे उद्घाटन त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. 
या औषधांच्या दुकानांकरिता एक कोटीचा खर्च आला असून येथे नागरिकांना योग्य दर्जाची व           वाजवी किमतीची औषधे मिळतील असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. 
अम्मा मीठ, अम्मा मिनरल वॉटर, अम्मा कॅन्टीन्सच्या मालिकेतील ही अम्मा मेडिकल्स असून नागरिकांमध्ये जयललिता या अम्मा नावाने परिचित आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Amma Medical Shop' now in Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.