राष्ट्रपतीपदासाठी मोदी सुचवणार अमिताभ यांचे नाव? अमर सिहांचा दावा

By Admin | Updated: March 31, 2016 11:18 IST2016-03-31T11:14:57+5:302016-03-31T11:18:10+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमिताभ बच्चन यांचे नाव भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी सूचवणार आहेत असा दावा अमर सिंह यांनी केला.

Amitabh's name to be proposed for President Amar Singh's claim | राष्ट्रपतीपदासाठी मोदी सुचवणार अमिताभ यांचे नाव? अमर सिहांचा दावा

राष्ट्रपतीपदासाठी मोदी सुचवणार अमिताभ यांचे नाव? अमर सिहांचा दावा

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - ' पंतप्रधान नरेंद्र मोदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी सूचवणार आहेत' असा दावा समाजवादी पक्षाचे माजी नेते व अमिताभ बच्चन यांचे एकेकाळचे निकटवर्तीय अमर सिंह यांनी केला. एका वृत्तवाहिनीशा बोलताना त्यांनी हा दावा केला. दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपाचे खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही अमिताभ बच्चन हेच आगामी राष्ट्रपती असतील, असे वक्तव्य केले होते. 
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून २५ जुलै २०१२ साली पदभार स्वीकारला होता, त्यांचा कार्यकाळ पुढील वर्षी समाप्त होत असून त्याच पार्श्वभूमीवर नवे राष्ट्रपती कोण याची चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले अमर सिंह?
अमिताभ बच्चन व नरेंद्र मोदी यांची पहिली भेट आपणच घडवून आणली होती, तेव्हा ते (मोदी) गुजरातचे मुख्यमंत्री होतो. 'पा' चित्रपटासंदर्भात ही भेट झाली होती, असे अमरसिंह यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भेटीनंतरच मोदींनी अमिताभ यांना 'गुजरातचे ब्रँड अॅम्बेसेडर' म्हणून नियुक्त केल्याचा दावाही सिंह यांनी केला.

Web Title: Amitabh's name to be proposed for President Amar Singh's claim