सुरेश प्रभूंच्या तत्वनिष्ठ वागण्याने भारावले अमिताभ बच्चन

By Admin | Updated: March 1, 2016 15:36 IST2016-03-01T15:36:21+5:302016-03-01T15:36:21+5:30

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची अमिताभ बच्चन यांनी जाहीर स्तुती केली असून इतकी साधनसुचिता आणि तत्व पाळणारी माणसं हल्ली कुठे बघायला मिळतात असं कौतुकही केलं

Amitabh Bachchan fills his mind with Suresh Prabhu's devoted behavior | सुरेश प्रभूंच्या तत्वनिष्ठ वागण्याने भारावले अमिताभ बच्चन

सुरेश प्रभूंच्या तत्वनिष्ठ वागण्याने भारावले अमिताभ बच्चन

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची अमिताभ बच्चन यांनी जाहीर स्तुती केली असून  इतकी साधनसुचिता आणि तत्व पाळणारी माणसं हल्ली कुठे बघायला मिळतात असं कौतुकही केलं आहे. निमित्त होतं रेल्वेमंत्र्याच्या बजेटसी संबंधित...
बजेट सादर करताना सुरेश प्रभूंना हरीवंशराय बच्चन यांच्या कवितेचं वाचन करायचं होतं. प्रभूंनी त्यासाठी आधी अमिताभना फोन केला आणि त्यांची परवानगी घेतली. त्यानंतर त्यांनी त्या कवितेचं सादरीकरण केल्यानंतर पुन्हा बच्चन यांच्याकडे ही कविता मी व्यवस्थित सादर केली ना अशी पृच्छाही केली.
प्रभूंनी हरीवंशराय यांची कविता निवडावी याबद्दल आधी मला सन्मान वाटला आणि त्यानंतर प्रभूंनी ज्या विनयाने वर्तणूक केली तिने तर मी खूपच भारावल्याचं अमिताभ यांनी नमूद केलं आहे. अमिताभ म्हणतात, आज के जमानें में कोई नही करता ऐसा..

Web Title: Amitabh Bachchan fills his mind with Suresh Prabhu's devoted behavior