अमिताभ बच्चन व प्रियांका चोप्रा अतुल्य भारतचे ब्रँड अँबॅसिडर
By Admin | Updated: January 21, 2016 13:08 IST2016-01-21T12:56:08+5:302016-01-21T13:08:24+5:30
अतुल्य भारतचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून अमिताभ बच्चन व प्रियांका चोप्रा यांची निवड करण्यात आली आहे

अमिताभ बच्चन व प्रियांका चोप्रा अतुल्य भारतचे ब्रँड अँबॅसिडर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - अतुल्य भारतचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून अमिताभ बच्चन व प्रियांका चोप्रा यांची निवड करण्यात आली आहे. सहिष्णू असहिष्णूतेच्या वादात प्रतिकूल टिप्पणी केल्यानंतर आमिरवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. अतुल्य भारत किंवा इन्क्रेडिबल इंडियाचा तो ब्रँड अँबॅसिडर होता. त्याला या नियुक्तीवरून हटवण्यात आले होते.
विदेशी पर्यटकांना आकर्षित करणारे व भारत हा किती चांगला देश आहे असे लोकांच्या मनावर बिंबवणारे अतुल्य भारत ही सरकारी मोहीम आहे. जर, या मोहीमेच्या उद्देशाला ब्रँड अँबॅसिडरच हरताळ फासत असेल तर तो देशाची प्रतिमा उजळवण्याऐवजी मलिन करत असल्याची टिप्पणी या मोहिमेचे जनक व डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशनचे सचिव अमिताभ कांत यांनी केली होती.
या मोहिमेचे उद्दिष्ट्य गाठण्यास योग्य अशा ब्रँड अँबॅसिडरचा शोध सुरू होता. अमिताभ बच्चन, अक्षय कुमारसारख्या दिग्गजांनी यात रस दाखवला होता. अखेर, अमिताभ बच्चन व प्रियांका चोप्रा अतुल्य भारतच्या जाहिरातींमध्ये लवकरच झळकतिल असे स्पष्ट झाले आहे.
Being a Brand Ambassador imposes responsibilities. U can't run down what u're promoting.That's damaging d brand. https://t.co/mhHeZjYFrb
— Amitabh Kant (@amitabhk87) January 19, 2016