शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'मी ओरडल्यासारखं करतो, तुम्ही...'; अमित शाहांची नाराजी फक्त रणनीतीचा भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 12:07 IST

भाजपच्या नेत्यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलेली नाराजी ही काही पक्षाचे हृदयपरिवर्तन झाल्याचे संकेत नाहीत, तर केवळ डावपेच म्हणून घेतलेली भूमिका आहे.

ठळक मुद्देअमित शहा यांनी व्यक्त केलेली नाराजी ही काही पक्षाचे हृदयपरिवर्तन झाल्याचे संकेत नाहीत, तर केवळ डावपेच म्हणून घेतलेली भूमिका आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर भाजपशी युती केलीअमित शहा यांना हे ठावूक आहे की, जनता दलासोबत (संयुक्त) भाजपाला राहायचे असेल तर हिंदुत्वाचा कार्यक्रम काही कामास येणार नाही.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर प्रचारात भाजपच्या नेत्यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलेली नाराजी ही काही पक्षाचे हृदयपरिवर्तन झाल्याचे संकेत नाहीत, तर केवळ डावपेच म्हणून घेतलेली भूमिका आहे. बिहारमध्ये लगेच जी तातडीची गरज आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर भाजपशी युती केली व त्यांनी अमित शहा यांच्यासोबत प्रचारही केला. तरी भाजपच्या नेत्यांनी कडव्या हिंदुत्वाचा केलेला प्रचार हा त्यांना रुचलेला नाही. नितीश कुमार यांना ‘सुशासन बाबू’ असे बिहारमध्ये समजले जाते. कुमार यांची कामगिरी आणि अल्पसंख्य काही प्रमाणात का असेना आपल्या बाजूला त्यांनी ठेवल्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला त्यांच्यात पराभूत करण्याची क्षमता आहे. अमित शहा यांना हे ठावूक आहे की, जनता दलासोबत (संयुक्त) भाजपाला राहायचे असेल तर हिंदुत्वाचा कार्यक्रम काही कामास येणार नाही. दुसरे म्हणजे लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारमध्ये द्वेषाच्या कोणत्याही भाषणांना मुभा नाही, असा स्पष्ट इशारा आधीच दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी शांततेचा राग आळवला. परंतु शहा यांनी घेतलेली भूमिका ही तात्पुरती असून, बिहारमधील निवडणूक संपल्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुड्डुचेरीत होणाऱ्या निवडणुकीत भाजप आपल्या जुन्या कार्यक्रमासह सक्रिय होईल.>भाजपच्या भूमिकेमागचे राजकारण काय?येत्या सहा महिन्यांत बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. तेथे भाजप जनता दलाचा (संयुक्त) कनिष्ठ भागीदार.या सगळ्यात कडी म्हणजे भाजपने स्वत:चा द्वेष पसरवणारा कार्यक्रम बिहारमध्ये सुरूच ठेवला तर लोक जनशक्ती पक्षाचे नेते राम विलास पासवान यांनीही आम्ही भाजपसोबत असणार नाही, असे म्हटले. त्यामुळे विद्यमान खासदार आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांनी ‘गोली मारो आणि भारत-पाकिस्तान मॅच’ आदी केलेल्या वक्तव्यांचा अमित शहा यांनी निषेध करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.पराभवानंतर तीन दिवसांनी जाहीरपणे अमित शहा यांनी त्या वक्तव्यांचा निषेध केला त्याचे कारण म्हणजे बिहारमधील मित्रपक्षांनी वाजवलेली धोक्याची घंटा, असे भाजपमधील अंतर्गत सूत्रांनी सांगितले. बिहारमध्ये आपण जनता दलाचे (संयुक्त) कनिष्ठ सहकारी असून जनता दल किंवा लोक जनशक्ती पक्ष या विषयावर काही तडजोड करणार नाही याची भाजपला जाणीव आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहा