अमित शहा भाजपाचे अध्यक्ष होणार
By Admin | Updated: July 9, 2014 02:05 IST2014-07-09T02:05:12+5:302014-07-09T02:05:12+5:30
अमित शहा यांच्याकडे भाजपचे अध्यक्षपद दिले जाणार असून संघटनात्मक मुद्यांवर बुधवारी होणा:या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर त्यांच्या नावाची घोषणा अपेक्षित आहे.

अमित शहा भाजपाचे अध्यक्ष होणार
हरीश गुप्ता - नवी दिल्ली
विद्यमान सरचिटणीस अमित शहा यांच्याकडे भाजपचे अध्यक्षपद दिले जाणार असून संघटनात्मक मुद्यांवर बुधवारी होणा:या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर त्यांच्या नावाची घोषणा अपेक्षित आहे.
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरलीमनोहर जोशी यांच्याकडून विरोधाची शक्यता नसल्याने निवडीवर एकमताने शिक्कामोर्तब होणार हे निश्चित मानले जात आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर 25 मे रोजी लोकमतनेच सर्वप्रथम अमित शहा यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार असे वृत्त दिले
होते. भाजपने उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 8क् पैकी 73 जागा जिंकत गेल्या 4क् वर्षात कुणीही न केलेला विक्रम आपल्या नावावर केला आहे. शहा यांच्या रणनीतीमुळेच या राज्यात बसपा, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचा सफाया झाला असा दावा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास विश्वासू असल्याने पक्षाध्यक्षपदासाठी शहा यांचेच नाव अग्रक्रमावर होते.
संघाकडून शिक्कामोर्तब
शहा यांच्यासोबत मुरलीधर राव, जे.पी. नड्डा, ओम प्रकाश माथूर यांची नावेही चर्चेत आली होती.
येत्या तीन वर्षात विविध राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळे शहा यांच्यासारख्या रणनीतीतज्ज्ञाकडेच पक्षाध्यक्षपदाची धुरा असावी असे मानून
रा.स्व. संघानेही मंजुरीची मोहर उठवली आहे.