प्रक्षोभक भाषणामुळे अमित शहा अडचणीत
By Admin | Updated: September 11, 2014 03:34 IST2014-09-11T03:34:05+5:302014-09-11T03:34:05+5:30
लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशात ‘आक्षेपार्ह’ भाषण देऊन आदर्श आचारसंहितेचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आज बुधवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले़

प्रक्षोभक भाषणामुळे अमित शहा अडचणीत
मुजफ्फरनगर : लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशात ‘आक्षेपार्ह’ भाषण देऊन आदर्श आचारसंहितेचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आज बुधवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले़. धर्म, वंश, जाती आणि समुदायाच्या आधारावर कथितरीत्या मते मागितल्याप्रकरणी येथील एका न्यायालयात पोलिसांनी शहा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले़ नवी मंडी क्षेत्राचे उपअधीक्षक योगेंद्र सिंह यांनी सांगितले की, शहा यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या विविध कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले़ पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, शहांविरुद्ध आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला होता़ आयोगाने ४ एप्रिल २०१४ रोजी शहांवर उत्तर प्रदेशात प्रचार करण्यावर बंदी आणली होती़ (वृत्तसंस्था)