शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह उद्या तेलंगणाच्या दौऱ्यावर, एसएस राजामौली यांचीही भेट घेणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 15:33 IST

बुधवारी रात्री अमित शाह एका विशेष विमानाने हैदराबादला पोहोचतील. हैदराबादपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या खम्मममध्ये गुरुवारी अमित शाह जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी (15 जून) चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात तेलंगणा भाजपच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान, एसएस राजामौली 'आरआरआर' आणि 'बाहुबली' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत.

बुधवारी रात्री अमित शाह एका विशेष विमानाने हैदराबादला पोहोचतील. हैदराबादपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या खम्मममध्ये गुरुवारी अमित शाह जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. याचबरोबर, अमित शाह हे राजामौली आणि राज्यातील काही प्रमुख लोकांना भेटतील. त्यांचा तेलंगणा दौरा हा भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या जनसंपर्क अभियानाचा एक भाग आहे, असे तेलंगणा भाजपचे प्रवक्ते एनव्ही सुभाष म्हणाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह हैदराबादहून हेलिकॉप्टरने भद्राचलमला पोहोचतील आणि श्री राम मंदिरात विशेष प्रार्थना करतील. तेथून भाजपचे वरिष्ठ नेते खम्मम येथे पोहोचतील आणि आंध्र प्रदेशचे (अविभाजित)  माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर जाहीर सभेत सामील होतील.

सार्वजनिक सभेला संबोधित केल्यानंतर अमित शाह हे विजयवाडा येथे जातील आणि रात्री अहमदाबादला जातील. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसला पर्याय म्हणून उदयास येण्याचे लक्ष्य ठेवून अमित शाह यांच्या रॅलीला यश मिळावे, याकडे भाजपचे लक्ष आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात अमित शाह यांनी 'आरआरआर' स्टार ज्युनियर एनटीआरची येथे भेट घेतली होती. तर या वर्षी मार्चमध्ये अमित शाह यांनी अभिनेता राम चरण आणि त्याचे वडील तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज चिरंजीवी यांचीही भेट घेतली होती.

टॅग्स :Amit Shahअमित शाहTelanganaतेलंगणा