शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'विनंती करतो सुरक्षा घ्या अन् आमची चिंता दूर करा'; अमित शाह यांचे ओवेसींना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 15:18 IST

एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत सरकारच्यावतीनं प्रतिक्रिया दिली.

नवी दिल्ली-

एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत सरकारच्यावतीनं प्रतिक्रिया दिली. हापुड येथे ओवेसी यांचा कोणताही कार्यक्रम नव्हता आणि प्रशासनाला देखील याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तरीही ओवेसी यांना माझी विनंती आहे की त्यांनी सरकारकडून दिली जाणारी सुरक्षा स्वीकार करावी, असं अमित शाह म्हणाले. 

ओवेसींवर झालल्या हल्ल्याची माहिती देताना अमित शाह म्हणाले की ३ फेब्रुवारी रोजी २०२२ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता खासदार ओवेसी जनसंपर्क करुन घरी परतत होते. त्यावेळी दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. या घटनेचे तीन साक्षीदार देखील आहेत. संपूर्ण घटनेबाबत पिलखुवा येथे एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे आणि याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे, असं अमित शाह म्हणाले. 

हापुड येथे ओवेसींचा कोणताही कार्यक्रम नव्हता- शाहसमोर आलेल्या माहितीनुसार हापुड येथे ओवेसी यांचा कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता किंवा कोणत्याही कार्यक्रमाची स्थानिक प्रशासनाला देखील कल्पना देण्यात आली नव्हती. ओवेसी सुरक्षितपणे दिल्लीला पोहोचले. सध्या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे. ओवेसी यांच्यासोबत सुरक्षा देण्याबाबतची चर्चा देखील झाली. त्यांच्या जीवाला असलेल्या धोक्याचं मूल्यांकन करुन झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. पण त्यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे, अशीही माहिती शाह यांनी संसदेत दिली आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी