शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अमित शाह यांचे 'मिशन काश्मीर'; बैठकांचं सत्र, दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी केला 'मास्टरप्लान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 19:22 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असून शुक्रवारी दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात सुरक्षा बैठक घेतली.

नवी दिल्ली-केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजम्मू-काश्मीर दौऱ्यावर असून शुक्रवारी दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात सुरक्षा बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केलं. अमित शाह यांनी राजौरी येथील हल्ल्यावर दु:ख व्यक्त केलं. "खराब वातावरणामुळे काश्मीर खोऱ्यात घडलेल्या दुर्देवी घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मला जाता आलं नाही. माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे", अशी माहिती अमित शाह यांनी दिली. राजौरी जिल्ह्यातील धंगरी गावात १ जानेवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. आज गृहमंत्री अमित शाह राजभवनावर गेले जिथं त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा बैठक झाली. यात उपराज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव एके भल्ला, आयबीचे प्रमुख आणि रॉचे प्रमुख यांच्यासोबत सीआरपीएफ, बीएसएफ तसंच पोलिसही उपस्थित होते. 

शोकाकुल कुटुंबीयांनी मोठी हिंमत दाखवून दहशतवादाविरोधात लढण्याची तयारी दाखवली असल्याचं अमित शाह म्हणाले. "सुरक्षा यंत्रणांसोबतच्या बैठकीत सर्व पैलूंवर चर्चा झाली. येणाऱ्या दिवसात सुरक्षित ग्रीड तयार करण्यासंदर्भात विचार झाला आहे. बीएसएफ, सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्करसह सर्व यंत्रणा सज्ज आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचंही मनोबल वाढलं आहे. शनिवारी एनआयए आणि पोलीस या घटनेची चौकशी करतील. गेल्या दीड वर्षात जितक्या दहशतवादी घटना घडल्या आहेत. त्या सर्वांची चौकशी होईल. माहिती देणाऱ्या संस्था देखील मजबूत होतील. दहशतवादाविरोधात झीरो टॉलरेन्स नीति पुढे नेली जाणार आहे. राजौरीतील घटनेला जबाबदारी असणाऱ्यांना कडक शिक्षा केली जाईल", असं अमित शाह म्हणाले. 

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर दहशतवादी घटनांमध्ये घट झाल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, एका घटनेच्या आधारे खोऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही. सुरक्षाकडं अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. राजौरी दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे, असंही शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला