शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

Amit Shah on Rahul Gandhi: "राहुल बाबा, इटालियन चष्मा काढा, मगच 8 वर्षांत काय विकास झाला ते दिसेल"; अमित शहांचा राहुल गांधींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 16:01 IST

Amit Shah Attack on Congress: अरुणाचल दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.

Amit Shah in Arunachal Pradesh: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) रुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शहांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) खिल्ली उडवली. "राहुल बाबा, डोळे उघडा... इटालियन चष्मा काढा आणि भारतीय चष्मा घाला, मगच तुम्हाला कळेल या 8 वर्षांत काय विकास झाला," अशी टीका अमित शहांनी केली.

अमित शहा इथेच थांबले नाहीत, तर काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, "काँग्रेसवाले डोळे झाकून विकास पाहत आहेत. 8 वर्षात पर्यटन वाढवणे, कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, पायाभूत सुविधा वाढवणे आणि विकास वाढवणे हे पेमा खांडू आणि नरेंद्र मोदी यांच्या डबल इंजिन सरकारने 50 8 वर्षात केलं. काँग्रेसने जगाला ईशान्येतील वाद दाखवला. पण, भाजप सरकारच्या काळात 2019 ते 2022 पर्यंत 9 हजार 600 अतिरेक्यांनी शस्त्रे टाकून सामान्य जीवन जगण्याचे काम केले आहे. आता काही दिवसांत दोन्ही राज्यांमधील सीमावादही संपुष्टात येणार आहे."

राज्यात रस्त्यांचे जाळे विणलेशहा पुढे म्हणाले की, "राज्यातील दूरवरच्या भागांना जोडण्यासोबतच आम्ही संपूर्ण राज्यात रस्त्यांचे जाळे विणले आहे. आम्ही परशुराम कुंडही रेल्वेच्या माध्यमातून जोडू. मी 2 दिवस राज्यात आहे आणि नमसाई जिल्ह्यातील लोकांशी संवाद साधत आहे. पण मला एक गोष्ट मान्य करावी लागेल की, मी देशातील प्रत्येक ठिकाणी भेट दिली आहे परंतु संपूर्ण देशातील सर्वात सुंदर ठिकाण जर असेल तर ते अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचलचे लोक कुठेही भेटले तर लगेच जय हिंद म्हणत त्यांना शुभेच्छा देतात. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली अभिवादनाची ही पद्धत या राज्याशिवाय देशात कुठेही नाही." 

टॅग्स :Amit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश