शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांना भेटला शेरास सव्वाशेर, दिलं जशास तसं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 21:46 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी तेलंगणामध्ये मुदतीपूर्वीच होणा-या निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हैदराबाद- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी तेलंगणामध्ये मुदतीपूर्वीच होणा-या निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीनंही अमित शाहांवर पलटवार केला आहे. आधी मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2002च्या निवडणुकांसंदर्भात विचारा, असं प्रत्युत्तर चंद्रशेखर राव यांनी दिलं आहे.अमित शाह निवडणुकीच्या प्रचारासाठी तेलंगणामध्ये दाखल झाले आहेत. जर तेलंगणातल्या निवडणुका लोकसभेबरोबर झाल्या असत्या तर केसीआर यांना पराभव चित्र पाहायला लागलं असतं. त्यामुळे त्यांनी मुदतीपूर्वी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. केसीआर मोदींना घाबरतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी विधानसभा विसर्जित करून जनतेवर कोट्यवधी रुपयांचा निवडणूक खर्च लादला आहे. त्यानंतर लोकसभेचे खासदार असलेल्या बी. विनोद कुमार यांनीही अमित शाहांना प्रतिप्रश्न केला आहे. बरेच मोठे नेते मुदतीपूर्वी निवडणुका करून झाले आहेत. मग केसीआर यांच्यावर प्रश्न का उपस्थित केला जातोय?, असं बी. विनोद कुमार म्हणाले आहेत.सर्वच राजकीय पक्ष कधी ना कधी मुदतीपूर्वी निवडणुका घेऊन झाले आहेत. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी, एनटी रामाराव आणि चंद्राबाबू नायडू, नरेंद्र मोदींनीही मुदतपूर्व निवडणुका घेतल्या आहेत. 2014च्या निवडणुकीत दलित मुख्यमंत्री बनवणार असल्याचं केसीआर यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु ते पूर्ण न केल्याचा आरोप अमित शाहांनी केला आहे. तसेच केसीआर हे स्वतःची मुलगी कविता किंवा मुलगा केटी रामाराव यांना मुख्यमंत्री बनवू इच्छितात. त्यावर कुमार म्हणाले, अमित शाहांना माहीत पाहिजे की, 2014मध्ये केसीआर यांनी अशा प्रकारचं कोणतंही विधान केलेलं नव्हतं. तसेच कोणी दलित मुख्यमंत्री बनेल, असंही म्हणाले नव्हते. तर पुन्हा केसीआर मुख्यमंत्री होतील, असा आम्हाला विश्वास असल्याचंही बी. विनोद कुमार म्हणाले आहेत. 

टॅग्स :Amit Shahअमित शाह