शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंवरील अन्यायामुळे मुफ्ती सरकारमधून बाहेर - अमित शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 04:41 IST

नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील विकासकामांसाठी जवळपास ८० हजार कोटींची निधी दिला होता परंतु हा पैसा जम्मू आणि लडाखपर्यंत पोहचलाच नाही

जम्मू : नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील विकासकामांसाठी जवळपास ८० हजार कोटींची निधी दिला होता परंतु हा पैसा जम्मू आणि लडाखपर्यंत पोहचलाच नाही, अशी प्रखर टीका भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी जम्मूमध्येकेली. मेहबुबा मुफ्ती सरकारच्या काळात राज्यातील हिंदुबहुल इलाख्यावर कसा अन्याय झाला, या मुद्द्यावरच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचार केला जाणार आहे, हे शहा यांनी आपल्या भाषणातून सूचित केले.जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या ऐतिहासिक बलिदान दिनानिमित्त एका रॅलीला संबोधित करण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा शनिवारी येथे आले. काही दिवसांपूर्वीच भाजपने पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर शहा यांचा हा पहिला काश्मीर दौरा आहे.यावेळी अमित शहा म्हणाले की, राज्यात विकासकामांमध्ये कायम दुजाभाव केला गेला. म्हणूनच जम्मू आणि लडाखच्या विकासाकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही घेतला. या वाक्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.भाजपाला काश्मीर खोºयामध्ये फारसा रस नाही कारण तिथे पक्षाला २०१४ च्या निवडणुकीत अवघी २.२ टक्के मते मिळाली होती. तिथे पक्षाला एकही जागा मिळाली नाही. भाजपाच्या एकूण २५ आमदारांपैकी २२ जम्मूतून निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीतही लडाख, जम्मू आणि उधमपूरच्या जागा भाजपाने जिंकल्या होत्या. त्यामुळे पक्षाने या भागावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या तीन पिढ्यांनी आतापर्यंत जम्मू काश्मीरची सत्ता सांभाळली परंतु त्यांनी राज्यासाठी भरीव असे काहीही केले नाही. आम्ही काश्मीरी पंडितांना आर्थिक पाठबळ दिले. पंडितांना ४० वर्षांपूर्वी राज्यातून बेदखल करण्यात आले होते. पीडीपीने पंडितांसाठी काहीही केले नाही, अशीही टीका त्यांनी केली.शहा यांचे जोरदार स्वागत करताना पक्षाच्या युवा शाखेने विमानतळ ते राज्य गेस्ट हाउसपर्यंत बाइक रॅली काढली. शहा यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना आणि अन्य वरिष्ठ नेते होते. अमित शहा हे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला. पक्षाच्या डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया स्वयंसेवकांसोबतही त्यांनी चर्चा केली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा