अमित शाहांनी दलित साधूंसोबत केलं स्नान

By Admin | Updated: May 11, 2016 23:58 IST2016-05-11T23:58:50+5:302016-05-11T23:58:50+5:30

सिंहस्थ कुंभमेळ्यात भाजपचे अध्यक्ष अमित शाहांनी दलित सांधूसोबत शिप्रा नदीतल्या वाल्मिकी घाटावर समरसता स्नान केलं आहे.

Amit Shah made bath with Dalit sadhas | अमित शाहांनी दलित साधूंसोबत केलं स्नान

अमित शाहांनी दलित साधूंसोबत केलं स्नान

 ऑनलाइन लोकमत

उज्जैन, दि. 11 - सिंहस्थ कुंभमेळ्यात भाजपचे अध्यक्ष अमित शाहांनी दलित सांधूसोबत शिप्रा नदीतल्या वाल्मिकी घाटावर समरसता स्नान केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून अमित शाहांनी दलित साधूंसोबत समरसता स्नान केल्याची राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगू लागली आहे. 
या दलित साधूंसोबत अमित शाहांनी स्नान केल्यानंतर जेवणही केलं आहे. शिप्रा नदीत अमित शाहांसोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि अन्य नेत्यांनी स्नान केलं आहे. यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी, जुना आखाडा पीठाचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद आणि पीठाधीश्वर उमेशनाथही उपस्थित होते. 
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यावेळी सरसंघचालक मोहन भागवतांनीही उपस्थिती दर्शवली आहे. शिप्रा नदीत मोहन भागवतांनीही स्नान केलं आहे. त्यानंतर त्यांनी शिप्रा नदीकाठच्या आदिवासींसोबत जेवण केलं. 

Web Title: Amit Shah made bath with Dalit sadhas