शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

ईशान्य भारताचा दौरा करण्याची अमित शाहांमध्ये हिंमत नाही; सोनिया गांधींचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 17:40 IST

Citizen Amendment Act : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईशान्य भारतात होत असलेल्या हिंसाचारावरून मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्लीः काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईशान्य भारतात होत असलेल्या हिंसाचारावरून मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. ईशान्य भारताचा दौरा करण्याची अमित शाहांमध्ये हिंमत नाही, असं म्हणत सोनिया गांधींना थेट आव्हान दिलं आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून देशभरात हिंसाचार सुरू आहे. ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये नागरिकत्व कायद्यावरून अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळून आला आहे. आसाम आणि त्रिपुराच्या अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवानांना तैनात करण्यात आलं आहे. अमित शाह हे ईशान्य भारताच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु तिथली परिस्थिती चिघळलेली असल्यामुळे त्यांनी ईशान्य भारताचा दौरा रद्द केला होता. 

सरकारनं शांती आणि सौहार्द कायम ठेवलं पाहिजे. कायद्याचं शासन चालायला हवं. संविधानाची रक्षा करायला हवी. परंतु भाजपा सरकार देश आणि देशावासीयांवरच हल्ले करत आहे. मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी आहे. मोदी सरकारनं देशाला द्वेषाच्या अंधकारात ढकलून दिलं आहे. तसेच तरुणांचं भवितव्य तापलेल्या भट्टीमध्ये सोडण्यात आलं आहे, असंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे. नव्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आसामसह ईशान्य भारतातील इतर राज्यांत पेटलेल्या आंदोलनाची धग आणखी वाढली आहे. गुवाहाटीमध्ये संचारबंदीला न जुमानता लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत असून बाजारपेठा, दुकाने सर्व बंद आहेत. वाहतूक व जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या या दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे कायद्यात रूपांतर झालेल्या कायद्याविरोधात आंदोलनाने सर्वात रौद्र रूप आसाममध्ये धारण केले आहे. तिथे निदर्शनांमुळे सर्व रस्ते बंद असल्याने काही रेल्वे स्थानके व विमानतळावर अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे. 

ईशान्य भारतानंतर या आंदोलनाचं लोण दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे. दिल्लीतल्या जामिया मिलिया विद्यापीठातही हिंसाचार झाला आहे. विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या संघटनांनी या हिंसाचाराशी विद्यार्थ्यांचा काही संबंध नसल्याचं सांगितलं. कॅम्पसबाहेरचे हे आंदोलन व हिंसाचार स्थानिक लोकांनी केले असून, विद्यापीठाला बदनाम करण्यासाठी त्याचे खापर आमच्यावर फोडले जात असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेने केला. या आंदोलन व हिंसाचारामुळे दिल्ली मेट्रोची जामिया, सुखदेव विहार, जसोला, शाहीन बाग व आश्रम रोडसह तेरा स्थानके काल संध्याकाळनंतर बंद करण्यात आली होती व गाड्यांचे तेथील थांबेही रद्द करण्यात आले होती. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.या आंदोलनापायी विद्यापीठाने सर्व परीक्षा रद्द करून 5 जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर केली. या आंदोलनाचा रविवारी सहावा दिवस होता. शेकडो विद्यार्थी, तरुण, विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांचे प्रतिनिधी रविवारी जामियाजवळ जमले होते. सायंकाळी चार वाजता हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले. त्यांच्यासमोर एका राजकीय नेत्याचे भाषण झाले. जमावाचा त्यामुळेच भडका उडाला व बसेसची जाळपोळ सुरू झाली.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकSonia Gandhiसोनिया गांधीAmit Shahअमित शहा