नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने भाजपा आणि तृणमूल काँग्रेस पक्ष आमनेसामने आले आहेत. दरम्यान, भाजपाची रथयात्रा रोखल्याने तीळपापड झालेल्या भाजपा अध्यक्षांनी ममता बॅनर्जी यांच्यावर थेट हल्ला केला असून, ममता बॅनर्जी यांच्या सरकारने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप शाह यांनी केला आहे. बंगालमधील पंचायत निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींची झोप उडाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या सरकारने रथयात्रेला परवानगी नाकारल्याने भाजपाने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित शाह म्हणाले की, ''बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशामुळे ममता बॅनर्जी बावचळल्या आहेत.'' भाजपाच्या रथयात्रेमुळे राज्यात सांप्रदायिक तणाव निर्माण होऊ शकतो, असे कारण देत पश्चिम बंगाल सरकारने भाजपाच्या रथयात्रेला परवानगी नाकारली होती.
बंगालमध्ये भाजपाची रथयात्रा रोखल्याने अमित शाह यांचा तीळपापड, ममता बॅनर्जींवर केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 16:27 IST
पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने भाजपा आणि तृणमूल काँग्रेस पक्ष आमनेसामने आले आहेत.
बंगालमध्ये भाजपाची रथयात्रा रोखल्याने अमित शाह यांचा तीळपापड, ममता बॅनर्जींवर केली टीका
ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने भाजपा आणि तृणमूल काँग्रेस पक्ष आमनेसामने आले आहेत. भाजपाची रथयात्रा रोखल्याने तीळपापड झालेल्या भाजपा अध्यक्षांनी ममता बॅनर्जी यांच्यावर थेट हल्ला केला असून, ममता बॅनर्जी यांच्या सरकारने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप शाह यांनी केला आहे. भाजपाच्या रथयात्रेमुळे राज्यात सांप्रदायिक तणाव निर्माण होऊ शकतो, असे कारण देत पश्चिम बंगाल सरकारने भाजपाच्या रथयात्रेला परवानगी नाकारली होती.