शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सीएए, एनपीआरवरून अमित शाहांचे विरोधकांना प्रतिआव्हान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 20:09 IST

सीएए आणि एनपीआरबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना प्रतिआव्हान दिले आहे.

नवी दिल्ली - दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीवरून आज राज्यसभेत वादळी चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत उसळलेल्या दंगलीमागची कारणे आणि परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहासमोर मांडली. तसेच सीएए आणि एनपीआरबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवांवरून विरोधकांना प्रतिआव्हान दिले आहे. एनपीआर नोंदणीसाठी नागरिकांकडून कुठलीही कागदपत्रे मागितली जाणार नाहीत, तसेच कुठल्याही नागरिकाच्या नावासमोर संशयास्पद म्हणून नोंद होणार नाही,  असे अमित शाह यांनी सांगितले.

एनपीआरबाबत माहिती देताना अमित शाह राज्यसभेत म्हणाले की, एनपीआरमध्ये काही नागरिकांच्या नावासमोर डी म्हणजेच संशयास्पद नागरिक म्हणून नोंद होणार असल्याचे विधान काही सदस्यांनी केले आहे. मात्र मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की एनपीआयमधून कुठल्याही नागरिकाच्या नावासमोर संशयास्पद म्हणून नोंद होणार नाही.  मी एनपीआरबाबत सभागृहासमोर तीन बाबी स्पष्ट करू इच्छितो. पहिली बाब म्हणजे एनपीआरमध्ये कुठलीही कागदपत्रे मागितली जाणार नाहीत, दुसरी बाब म्हणजे नागरिकांना जी माहिती नाही ती माहिती देण्याची गरज नाही आणि तिसरी बाब म्हणजे कुठल्याही नागरिकाच्या नावावर संशयास्पद म्हणून नोंद होणार नाही.’’

दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरूनही अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामधून नागरिकत्व हिरावून घेतले जाणार, असल्याचा भ्रम काही नेत्यांनी पसरवून विशिष्ट्य समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. मात्र नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात कुणाचे नागरिकत्व हिरावून घेण्याची कुठली तरतूद आहे का? हे विरोधकांनी सांगावे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकRajya Sabhaराज्यसभा