अमित शहा यांची भाजपाध्यक्षपदी निवड
By Admin | Updated: July 9, 2014 12:46 IST2014-07-09T12:45:00+5:302014-07-09T12:46:50+5:30
भारतीय जनता पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून अमित शहा यांची निवड करण्यात आली असून भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी शहा यांच्या नावाची घोषणा केली

अमित शहा यांची भाजपाध्यक्षपदी निवड
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - भारतीय जनता पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून अमित शहा यांची निवड करण्यात आली असून भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी शहा यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, अरूण जेटली, सुषमा स्वराज यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.
दरम्यान शहा यांच्या नावाची घोषणा होताच दिल्ली, गुजरातसह देशभरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
भाजपने उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ७३ जागा जिंकत गेल्या ४० वर्षात कुणीही न केलेला विक्रम आपल्या नावावर केला आहे. शहा यांच्या रणनीतीमुळेच या राज्यात बसपा, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचा सफाया झाला असा दावा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास विश्वासू असल्याने पक्षाध्यक्षपदासाठी शहा यांचेच नाव अग्रक्रमावर होते. तसेच संघानेही शहा यांच्या नावाला मान्यता दर्शवली होती. येत्या तीन वर्षात विविध राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळे शहा यांच्यासारख्या रणनीतीतज्ज्ञाकडेच पक्षाध्यक्षपदाची धुरा असावी असे मानून रा.स्व. संघानेही मंजुरीची मोहर उठवली.