अमित शाह म्हणजे सर्वात मोठा 'कसाब'- मायावती
By Admin | Updated: February 23, 2017 19:34 IST2017-02-23T19:34:04+5:302017-02-23T19:34:04+5:30
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वच राजकिय पक्षांकडून एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे.

अमित शाह म्हणजे सर्वात मोठा 'कसाब'- मायावती
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 23 - उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वच राजकिय पक्षांकडून एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी कसाबवरून केलेल्या टीकेवर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाह हेच खरे कसाब आहेत असं त्या म्हणाल्या.
गुरूवारी एका प्रचार सभेला संबोधित करताना त्या म्हणाल्या, अमित शाह यांच्यापेक्षा मोठा कसाब कोणी नाही हे संपूर्ण देशाला माहिती आहे. काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रॅलीला संबोधित करताना विरोधकांची तुलना कसाब सोबत केली होती.
उत्तर प्रदेशचा विकास हा या कसाबमुळेच थांबला आहे. या कसाबला उत्तर प्रदेशमधून बाहेर हाकलून द्या, असं म्हणत कसाब या शब्दाची फोडणी करताना शाह म्हणाले होते, क म्हणजे काँग्रेस, स म्हणजे समाजवादी पार्टी आणि ब म्हणजे बहुजन समाज पार्टी .
उत्तर प्रदेशमध्ये अजूनही तीन टप्प्यातील मतदान बाकी आहे, त्यामुळे येथे प्रचाराची आणि टीकेची पातळी आणखी खालावण्याची शक्यता आहे.