शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 20:14 IST

शाह यांनी हा निर्णय एतिहासिक असल्याचे म्हटले आहे. तर ओवेसी यांनी, मुस्लीम समाजाच्या मागासलेपणासंदर्भात योग्य डेटा उपलब्ध होणे, काळाची गरज असल्याचे म्हटले आहे...

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशात जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. आज झालेल्या सीसीपीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यास आला. दरम्यान,  मागच्या बऱ्याच काळापासून विविध संघटना आणि विरोधी पक्षांकडून जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी केली जात होत. यासंदर्भात आता केंद्रिय गृहमंत्री अमित शाह आणि एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया आली आहे. शाह यांनी हा निर्णय एतिहासिक असल्याचे म्हटले आहे. तर ओवेसी यांनी, मुस्लीम समाजाच्या मागासलेपणासंदर्भात योग्य डेटा उपलब्ध होणे, काळाची गरज असल्याचे म्हटले आहे. 

मोदी सरकारचा एतिहासिक निर्णय : अमित शाह -यासंदर्भात बोलताना गृह मंत्री अमित शाह म्हणाले, "सामाजिक न्यायासाठी संकल्पबद्ध असणाऱ्या मोदी सरकारने आज एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या सीसीपीएच्या बैठकीत, आगामी जनगणनेत जातीय जनगणनेचा समावेश करण्याचा निर्णय घेऊन सामाजिक समानता आणि प्रत्येक घटकाच्या हक्कांप्रती दृढ वचनबद्धतेचा संदेश देण्यात आला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सत्तेत असताना अनेक दशके जातीय जनगणनेला विरोध केला आणि विरोधी पक्षात असताना त्यावर राजकारण केले. या निर्णयामुळे सर्व आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास वर्ग सक्षम होतील, समावेशनाला चालना मिळेल आणि वंचितांसाठी प्रगतीचे नवे मार्ग प्रशस्त होतील."

काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी? -यासंदर्भात बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "मुस्लीम समाजाच्या मागासलेपणासंदर्भात योग्य डेटा उपलब्ध होणे, काळाची गरज आहे. ज्यात मुस्लिमांमधील विविध जाती/ समूहांचा समावेश असावा. एनएसएसओ आणि इतर आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येते की, मुस्लिम आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत. भाजपने दलित मुस्लिमांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्यास विरोध केला आहे. त्यांनी मागास मुस्लिमांसाठी आरक्षणालाही विरोध केला आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा