नवी दिल्ली - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या तरी राज्य आणि केंद्रात एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संबंध अद्याप निवळलेले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आज पुन्हा एकदा चर्चा केली. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रात पेटलेले मराठा आरक्षण आंदोलन, राज्यसभेच्या उपसभापतींची निवडणूक तसेच मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अमित शाह यांची उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 16:49 IST