शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

अमित शहा कायद्याच्याही वर आहेत का : खंडपीठाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 5:24 PM

दाबोळी विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जाहीर सभेला परवानगी दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

पणजी, दि. 16 : दाबोळी विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जाहीर सभेला परवानगी दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाची चांगलीच कानउघाडणी केली आहे. शहा कायद्याच्याही वर आहेत का, असा सवाल करुन या प्रकाराची पुनरावृत्ती होता कामा नये, अशी तंबीच दिली आहे.१ जुलै रोजी झालेल्या या सभेच्या प्रकरणात समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती जी. एस. पटेल व न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांच्यासमोर बुधवारी ही याचिका सुनावणीस आली. खंडपीठ पुढील आदेश येत्या २१ रोजी देणार आहे. या विमानतळावर नौदल तळ असल्याने ती संवेदनशील जागा आहे. संरक्षण दलाच्या जागेत ही सभा घेण्यात आली ती अत्यंत संवेदनशील मानली जाते. सभेमुळे विमानतळावर जाणाºया-येणाºयांची गैरसोय झाली तसेच भादंसंच्या कलम १४१ चे उल्लंघन झालेले आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.या बेकायदा कृत्याबद्दल अमित शहा तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरुध्द या प्रकरणात गुन्हे नोंदविण्याचा आदेश दिला जावा, अशी आयरिश यांची मागणी आहे. याचिकेत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे संचालक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे डेप्युटी कमांडंट यांना प्रतिवादी करण्यात आले आहे तसेच देशाच्या इतिहासात बहुधा प्रथमच विमानतळासारख्या सुरक्षेच्यादृष्टिने अतिसंवेदनशील आवारात राजकीय पक्षाने अशी जाहीर सभा घेतलेली असावी, असे मत व्यक्त करताना. सरकारला कायद्याचा भंग करण्याची परवानगी कोणी दिली, असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे.हा प्रकार उत्स्फूर्ततेने घडला, असा बचाव प्राधिकरणाने घेतला असता न्यायालयाने ते मान्य न करता ही सभा पूर्वनियोजित नव्हती तर व्यासपीठ, सोफा, रेड कार्पेड, ध्वनी यंत्रणा अचानक कुठून आले, असा सवाल न्यायालयाने केला. विमानतळावर सभा घेण्याची परवानगी प्राधिकरणाने आधी कोणाला दिली होती का, तसेच ह्यउद्या मला मुलाचा वाढदिवस विमानतळावर साजरा करायचा झाला तर परवानगी देणार का?,ह्ण असा प्रश्नही न्यायमूर्ती पटेल यांनी केला.आयरिश यांनी न्यायालयाला सभेचे फोटोही सादर केले. भाजपने एकीकडे ही सभा पूर्वनियोजित नव्हती व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूततेने सर्व काही घडल्याचा दावा केला होता तर दुसरीकडे सभेसाठी आवश्यक ती परवानगी घेतली होती असाही पक्षाचा दावा आहे यात खरे काय, असा आयरिश यांचा सवाल आहे. ⁠⁠⁠⁠