शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: सोशल डिस्टन्सिंगची एैशीतैशी; शेकडोंच्या उपस्थितीत भाजपा आमदाराची बिर्याणी पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 11:56 IST

CoronaVirus पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला भाजपा आमदाराकडून हरताळ

बंगळुरू: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरातच राहा, सोशल डिस्टन्सिंग पाळा असं कळकळीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार करत आहेत. मात्र तरीही कित्येकांना याचं गांभीर्य समजलेलं नाही. यामध्ये भाजपाच्या काही नेत्यांचादेखील समावेश आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचं आवाहन पंतप्रधान आणि प्रशासनाकडून केलं जात असताना काही जण त्याला हरताळ फासत आहेत. कर्नाटकच्या टुमकूरमध्ये असाच एक प्रकार पाहायला मिळाला.कर्नाटकच्या टुमकूरचे भाजपा आमदार एम. जयराम यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बिर्याणी पार्टी दिली. गुब्बी शहरातील लोक मोठ्या संख्येनं या पार्टीला जमले होते. विशेष म्हणजे सरकारी शाळेत त्यांनी ही पार्टी दिली. जयराम यांच्या पार्टीला उपस्थित असलेल्या अनेकांनी फेस मास्क घातला होता. मात्र त्यांनी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी गर्दी टाळा, कार्यक्रमाचं आयोजन करू नका, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी अनेकदा केल्या आहेत. मात्र भाजपाच्याच काही नेत्यांनीच त्यांच्या सूचना गांभीर्यानं घेतल्या नसल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं. कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे २०७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १६७ जणांवर सध्या उपचार सुरू असून ३४ जणांची प्रकृती सुधारली आहे. राज्यात आतापर्यंत ६ जणांना कोरोनामुळे जीव गमावला आहे. तर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा साडे सात हजारांच्या पुढे गेला आहे. कोरोनामुळे २४९ जणांना जीव गमवावा लागला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी