शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

Farmer protest : अमेरिकेकडून मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचं स्वागत!; अशी आली प्रतिक्रिया

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 4, 2021 10:56 IST

अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने भारत सरकारच्या तीनही नव्या कृषी कायद्यांना समर्थन दर्शवले आहे. तसेच, यामुळे भारतीय बाजाराची उपयोगिता वाढेल, असे म्हटले आहे.

वॉशिंग्टन - देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता जागातील चर्चेचा विषय बनले आहे. या प्रकरणावर आता अमेरिकेकडूनही प्रतिक्रिया आली आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांचे समर्थन करत, कुठलाही वाद अथवा आंदोलनावर दोन्ही पक्षांत चर्चा व्हायला हवी आणि त्यातून समाधान निघायला हवे, असे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने म्हटले आहे.

अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने भारत सरकारच्या तीनही नव्या कृषी कायद्यांना समर्थन दर्शवले आहे. तसेच, यामुळे भारतीय बाजाराची उपयोगिता वाढेल. कृषी क्षेत्राला अधिक चांगले करण्यासाठी कुठल्याही निर्णयाचे अमेरिका स्वागत करते आणि खासगी क्षेत्रालाही याकडे आणण्याचे स्वागत आहे, असे म्हटले आहे.याच बरोबर, शांततामय पद्धतीने सुरू असलेले आंदोलन हे लोकशाहीचा भाग आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही हेच म्हटले आहे. जर दोन्ही पक्षांत काही मतभेद असतील, तर ते चर्चेतून सोडवायला हवेत, असेही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. म्हत्वाचे म्हणजे जो बायडेन प्रशासनाकडून पहिल्यांदाच भारतात सुरू असलेल्या आंदोलनावर थेट प्रतिक्रिया देण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंटरनेटचाही वापर केला जातो. यामुळे तो एक चांगल्या लोकशाहीचा भाग आहे, असेही अमेरिकेने म्हटले आहे. दिल्लीच्या सीमावर्ती भागात इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे. दिल्लीच्या टिकरी, सिंघू आणि गाझीपूर बॉर्डरवर येथे शेतकरी आंदोलन सुरू आहे. या भागात इंटरनेट बॅन आहे. तसेच हरियाणातील काही जिल्ह्यांतही इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे.

भारताकडून परदेशातील हस्तक्षेपाचा विरोध -भारतीय परराष्ट्रमंत्रालयाने आधीच म्हटले आहे, की शेतकऱ्यांची समस्या हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे कुठल्याही बाहेरील व्यक्ती अथवा संस्थेने यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही.

अमेरिकन पॉपस्टार रिहाना आणि इतर जागतीक सेलेब्रिटीजकजून या मुद्यावर प्रतिक्रिया आल्याने बराच वाद झाला आहे. यानंतर आता अमेरिकेकडूनही प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या या प्रतिक्रियेवर भारत काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

भारतीय क्रिकेटर्सनी परदेशी सेलिब्रेटींना फटकारले -यासंदर्भात पॉपस्टार रिहाना, मिया खलीफा (आधीची पोर्न स्टार) आणि ग्रेटा थनबर्ग आदींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे. यानंतर आता माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरपासून ते अनिल कुंबळेपर्यंत आणि विराट कोहलीपासून ते शिखर धवनपर्यंत आदिंनी सरकारच्या बाजूने उभे राहत शेतकरी आंदोलनावरून सरकारवर टीका करणाऱ्या परदेशी सेलिब्रेटींना फटकारले आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारInternetइंटरनेट