शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन तेल कंपन्या भारताला निर्यात करतात डर्टी फ्युएल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 18:14 IST

नवी दिल्ली- अमेरिकेच्या तेल कंपन्या भारताला घाणेरडं पेट्रोल निर्यात करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली- अमेरिकेच्या तेल कंपन्या भारताला घाणेरडं पेट्रोल निर्यात करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकेन रिफायनरिज ज्या डर्टी फ्युएलला देशात विकू शकत नाहीत, ते भारतात पाठवलं जातं. खरं तर भारतात प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत असतानाच हा प्रकार उघडकीस आला आहे. पेट्रोल हे फार स्वस्त असतं आणि कोळश्याहून ते अधिक तेजीनं जळतं. परंतु वातावरणाला तापदायक ठरणारं कार्बनही या डर्टी फ्युएलमध्ये जास्त प्रमाणात असतं.इतकेच नव्हे तर फुप्फुसांना सर्वाधिक नुकसान पोहोचवणा-या सल्फरचंही प्रमाण यात जास्त असतं. अमेरिकेचं हे पेट्रोलियम कोक टार सँड्स क्रूड आणि दुस-या हेवी ऑइल्समधून रिफाइन केल्यानंतरही बॅरलच्या खालीच राहतं. अमेरिकेत या पेट्रोलची विक्री होत नाही. त्यामुळे अमेरिका पेट्रोलची मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या देशांना असं पेट्रोल निर्यात करते. भारतही त्यांच्यातीलच फ्युएल आयात करणारा एक मोठा देश आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी जगभरात पाठवण्यात आलेल्या अमेरिकी पेट्रोलियम कोकचा एक चतुर्थांश भाग भारतात पाठवण्यात आला आहे.2016मध्ये अमेरिकेनं 80 लाख मेट्रिक टनांहून अधिक पेट्रोलियम कोक भारतात पाठवलं आहे. हे प्रमाण 2010च्या तुलनेत 20 टक्के जास्त आहे. या पेट्रोलियम कोकचं प्रमाण एवढं जास्त आहेत की, न्यू यॉर्कमधील अॅम्पायर स्टेट बिल्डिंगलाही 8 वेळा भरता येईल. भारतात निर्यात केलं जाणारं हे निकृष्ट पेट्रोलियम कोक अनेक कारखान्यात आणि संयंत्रांमध्ये वापरलं जातंय. त्यामुळे वायू प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. जगभरातल्या सर्वाधिक प्रदूषण असणा-या शहरांमध्ये भारतातल्या अनेक शहरांचा समावेश आहे. नवी दिल्लीतल्या अनेक नागरिकांनी वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. माझं जीवन समाप्त होत असून, माझ्या फुफ्फुसंही निकामी झाली आहेत, असंही विधान 63 वर्षीय बीर यांनी केलं आहे. 

टॅग्स :pollutionप्रदूषणPetrol Pumpपेट्रोल पंप