शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अमेरिकन जर्नलनंही मानलं, कोरोनाला पळवून लावण्यासाठी गंगाजल 'रामबाण'!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 21, 2020 15:52 IST

या संशोधनात, गंगेच्या पाण्याचा दैनंदिन वापर करणाऱ्या लोकांवर कोरोनाचा परिणाम केवळ 10 टक्के असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे संशोधन अमेरिकेच्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजीच्या अंकातही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

ठळक मुद्देया संशोधनात, गंगेच्या पाण्याचा दैनंदिन वापर करणाऱ्या लोकांवर कोरोनाचा परिणाम केवळ 10 टक्के असल्याचे समोर आले आहे.बीएचयूतील डॉक्‍टर कोरोनावर 'व्हायरोफेज' नावाने संशोधन करत आहेत.गंगाजलाचा नेजल स्‍प्रेदेखील तयार, परवानगीनंतर ट्रायललाही होणार सुरुवात

वाराणसी - सध्या भारतासह अनेक देश कोरोनावरील प्रभावी लस अथवा औषध शोधण्यासाठी कंबंर कसून कामाला लागले आहेत. अशातच काशी हिन्‍दू विद्यापीठाच्या (बीएचयू) इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसने (आयएमएस) गंगा नदीकाठी राहणाऱ्या लोकांवरील कोरोनाच्या परिणामासंदर्भात संशोधन केले आहे. या संशोधनात, गंगेच्या पाण्याचा दैनंदिन वापर करणाऱ्या लोकांवर कोरोनाचा परिणाम केवळ 10 टक्के असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे संशोधन अमेरिकेच्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजीच्या अंकातही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आता WHO प्राचीन औषधांमध्ये शोधणार कोरोनाचा इलाज! हर्बल मेडिसिनच्या ट्रायलचे केले समर्थन

बीएचयूतील डॉक्‍टर कोरोनावर 'व्हायरोफेज' नावाने संशोधन करत आहेत. न्‍यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. रामेश्‍वर चौरसिया आणि प्रसिद्ध न्‍यूरोलॉजिस्‍ट प्रा. व्ही. एन. मिश्रा यांच्या नेतृत्वातील चमूला आढळून आले, की नियमित गंगा स्‍नान करणाऱ्या आणि गंगेचे पाणी पिणाऱ्या लोकांना कोरोना संक्रमणाचा किंचितही परिणाम होत नाही.

गंगेकाठी राहणाऱ्या 90 टक्के लोकांचा करोनापासून बचाव -गंगेच्या काठावर राहणाऱ्या अथवा गंगेच्या पाण्याने स्‍नान करणाऱ्या 90 टक्के लोकांचा कोरोना संक्रमणापासून बचाव झाला आहे. याशिवाय, गंगेच्या काठावरील 42 जिल्ह्यांत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोरोनासंक्रमण 50 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तसेच संक्रमणानंतर लवकरात लवकर बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे.

केंद्र सरकारच्या 3 योजना, केवळ 400 रुपयांत सुरक्षित होईल भविष्य

गंगाजलाचा नेजल स्‍प्रेदेखील तयार -'वायरोफेज' रिसर्च टीमचे प्रमुख प्रा. व्ही.एन. मिश्र यांनी सांगितले, अभ्यासाबरोबरच गोमुखापासून ते गंगा सागरपर्यंत शंभर ठिकानांवर सॅम्पलिंग करण्यात आले आणि गंगेच्या पाण्यात ए-बायोटिकफेज अधिक अढळणारी ठिकानं निश्चित करण्यात आली. याशिवाय कोरोना रुग्णांवरील फेज थेरपीसाठीही गंगेच्या पाण्याचा नेजल स्‍प्रेदेखील तयार करण्यात आला आहे.

आता कधीच छापल्या जाणार नाहीत 2000च्या नोटा? मोदी सरकारनं संसदेत दिलं स्पष्टीकरण

परवानगीनंतर ट्रायललाही होणार सुरुवात -या संपूर्ण संशोधनाचा अहवाल आयएमएसच्या एका समितीला पाठविण्यात आला आहे. प्रा. व्ही. भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखालील या 12 सदस्‍यीय समितीच्या मंजुरीनंतर कोरोना रुग्णांवर फेज थेरेपीचे परीक्षण सुरू होईल.

गंगनानीच्या पाण्याने होणार 250 लोकांवर परीक्षण -गंगोत्रीपासून सुमारे 35 किलोमीटर खाली असलेल्या गंगनानी येथील पाण्याचा ह्यूमन ट्रायलसाठी वापर करण्यात येणार आहे. योजने प्रमाणे, 250 लोकांवर याचे परीक्षण केले जाईल. यातील अर्ध्या लोकांना औषधाशी कसल्याही प्रकारची छेडछाड केल्याशिवाय पंधरादिवसांसाठी गंगनानीचे पाणी नाकात टाकण्यासाठी दिले जाईल. तर इतरांना प्‍लेन डिस्टिल वॉटर देण्यात येईल. यानंतर आलेल्या परिणामांचा अभ्यास करून इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआर) अहवाल सादर केला जाईल.

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVaranasiवाराणसीmedicineऔषधंdoctorडॉक्टर