शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

राष्ट्रपती पद सोडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे पहिलेच भाषण, 'या' गोष्टीसाठी भारताला धरलं जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 18:50 IST

''आपल्याकडे सर्वात चांगली हवा आणि पाणी आहे. आपण स्वच्छ आहोत, मात्र चीन, रशिया आणि भारत स्वच्छ नसतील तर त्याचा काय उपयोग. ते धूर सोडत आहेत. आपल्याला माहितच आहे, की आपले जग म्हणजे ब्रह्मांडाचे एक छोटासा तुकडा आहे आणि आपण प्रत्येक गोष्ट वाचविण्याचा प्रयत्न करत आहोत.'' (India, China, Russia,)

ठळक मुद्देट्रम्प यांनी, अमेरिका पॅरिस कराराचा पुन्हा एकदा भाग झाल्याबद्दल ज्यो बायडन यांच्यावर टीका केली.ट्रम्प म्हणाले, अमेरिका आधीपासूनच स्वच्छ आहे. मात्र, चीन, रशिया आणि भारत स्वच्छ नाहीत.ट्रम्प यांनी 20 जानेवारीला व्हाईट हाऊस सोडले होते.

वॉशिंग्टन - व्हाईट हाऊस सोडल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांनी आपल्या पहिल्याच सार्वजनिक भाषणात हवामान बदलाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच पॅरिस कराराचा अमेरिका पुन्हा एकदा भाग झाल्याबद्दल ज्यो बायडन (Joe Biden) यांच्यावर टीका केली. ट्रम्प म्हणाले, अमेरिका आधीपासूनच स्वच्छ आहे. मात्र, चीन, रशिया आणि भारत स्वच्छ नाहीत. यामुळे या कराराचा भाग होण्यात काय अर्थ. ते रविवारी फ्लोरिडाच्या ऑरलँडो येथे कंझरव्हेटिव्ह राजकीय कारवाई समितीच्या कार्यक्रमात बोलत होते. ट्रम्प यांनी 20 जानेवारीला व्हाईट हाऊस सोडले होते.

ट्रम्प म्हणाले, ''सर्वप्रथम, चीनने गेल्या 10 वर्षांत यासंदर्भात काहीही पावले उचलली नाहीत. रशिया जुन्याच मापदंडांवर चालतो. जे स्पष्ट मापदंड नाहीत. मात्र, आपण सुरुवातीपासूनच याच्या जाळ्यात अडकलो. आपल्याला जेव्हा हजारो-लाखो नोकऱ्या गमवाव्या लागल्या, ही शोकांतिका होती. मात्र, ते मागे गेले.'' (America Donald trump attacks on India China and Russia says they are spreading air pollution)

अमेरिकेनं भारताकडून घेतलंय 216 अब्ज डॉलरच कर्ज, प्रत्येक नागरिकाच्या डोक्याव लाखोंच ऋण

''आपल्याकडे सर्वात चांगली हवा आणि पाणी आहे. आपण स्वच्छ आहोत, मात्र चीन, रशिया आणि भारत स्वच्छ नसतील तर त्याचा काय उपयोग. ते धूर सोडत आहेत. आपल्याला माहितच आहे, की आपले जग म्हणजे ब्रह्मांडाचे एक छोटासा तुकडा आहे आणि आपण प्रत्येक गोष्ट वाचविण्याचा प्रयत्न करत आहोत.''

अमेरिका 19 फेब्रुवारीला ऐतिहासिक पॅरिस कराराचा पुन्हा एकदा अधिकृतपणे भाग झाला. यापूर्वी 107 दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्या आदेशानंतर यापासून वेगळा झाला होता.

नवीन पक्ष स्थापन करणार?नवीन पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यक्रमात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही नवीन पक्षाची स्थापना केली जाणार नाही. असे केल्यास मतांचे विभाजन होईल आणि विजय संपादन करता येणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

बिहारमधील 'या' गावात राहते अब्जाधीश बिल गेट्स यांची मुलगी, गरिबीमुळे शाळेतही जाऊ शकत नाही!

2024 मध्ये पुन्हा निवडणूक लढणार -डोनाल्ड ट्रम्प यांनी 2014 मध्ये पुन्हा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. रिपब्लिकन पक्ष अधिक मजबूत होण्यावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले. आम्हीच निवडणूक जिंकलो होतो. मात्र, डेमोक्रेट्स पक्षाने फेरफार केला, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. जो बायडन सरकार काय करू शकेल, याचा अंदाज होता. मात्र, आताचे प्रशासनाचे कामकाज पाहता, अमेरिकेची अवस्था इतकी वाईट होईल, अशी कल्पना केली नव्हती. बायडन सरकार अमेरिकेला मागे घेऊन जाईल, असे वाटले नव्हते, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडनIndiaभारतchinaचीनrussiaरशिया