शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव होणारच, मुदतवाढ नाही, सहाराची सुप्रीम कोर्टाकडून खरडपट्टी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 04:21 IST

भरायला सांगितलेल्या १,५०० कोटी रुपयांपैकी शिल्लक राहिलेली ९६६ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहारा उद्योगसमुहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांना नकार दिला.

नवी दिल्ली : भरायला सांगितलेल्या १,५०० कोटी रुपयांपैकी शिल्लक राहिलेली ९६६ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहारा उद्योगसमुहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांना नकार दिला. तसेच रक्कम वसूल करण्यासाठी सहाराच्या मालकीच्या पुणे जिल्ह्यातील ‘अ‍ॅम्बी व्हॅली’चा लिलाव करण्याची पुढील प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘आॅफिशियल लिक्विडेटर’ने पुढे सुरु करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.न्यायालयाने १,५०० कोटी रुपये जमा करण्यासाठी सहाराला ७ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यापैकी ९६६ कोटी रुपये मुदतीत जमा करता न आल्याने रॉय यांच्यावतीने ११ नोव्हेंबर या पुढच्या तारकेचा चेक दिला गेला व तोपर्यंत मुदत वाढविण्याची विनंती केली गेली. मात्र असा पुढील तारखेचा चेक स्वीकारून मुदत वाढवून देणे म्हणजे न्यायाची थट्टा करणे होईल, असे सांगून सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने त्यास नकार दिला.रॉय यांची खरडपट्टी काढताना सरन्यायाधीश म्हणाले की, तुम्ही न्यायालयास आपल्या मर्जीप्रमाणे खेळवू पाहात आहात. जितके दिवस ‘व्हेंटिलेटर’वर जितके जिवंत राहता येईल तेवढे राहण़्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात. परंतु केव्हा ना केव्हा तरी ‘व्हेंटिलेटर’ काढावा लागेल व तेव्हा फक्त कलेवर शिल्लक उरेल, याचे भान ठेवा.‘आॅफिशियल लिक्विडेटर’ने ३७,३९२ कोटी रुपये राखीव किंमत ठरवून अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलावासाठी बोली मागविणारी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आता न्यायालायने हिरवा कंदील दाखविल्याने येणाºया बोलींची छाननी करून प्रत्यक्ष लिलावाची पुढील प्रक्रिया सुरु होऊ शकेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयIndiaभारत