अंबाझरीत विद्यार्थिनीची पर्स पळविली
By Admin | Updated: January 23, 2015 01:03 IST2015-01-23T01:03:39+5:302015-01-23T01:03:39+5:30
नागपूर : पायी जात असलेल्या विद्यार्थिनीची मोटरसायकलस्वार लुटारूंनी पर्स हिसकावून नेली. शिवाजीनगर अंबाझरीत बुधवारी रात्री ८.४५ ला ही घटना घडली. दिव्या मनीष राठी (वय १८) ही बुधवारी रात्री मोबाईलवर बोलत पायी घरी जात होती. एमएच ३१/ एएच १८६३ क्रमांकाच्या मोटरसायकलवर बसलेल्या दोन लुटारूंनी दिव्याचा मोबाईल तसेच तिच्या हातातील पर्स हिसकावून पळ काढला. या पर्समध्ये १० हजार रुपये होते. तिच्या मोबाईलची किंमत ३० हजार आहे. दिव्याने आरडाओरड करून आजूबाजूच्यांचे लक्ष वेधले. मात्र, त्यांना घटना माहीत पडेपर्यंत आरोपी नजरेआड झाले होते. दिव्या हिच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला. मोटरसायकल क्रमांकाच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

अंबाझरीत विद्यार्थिनीची पर्स पळविली
न गपूर : पायी जात असलेल्या विद्यार्थिनीची मोटरसायकलस्वार लुटारूंनी पर्स हिसकावून नेली. शिवाजीनगर अंबाझरीत बुधवारी रात्री ८.४५ ला ही घटना घडली. दिव्या मनीष राठी (वय १८) ही बुधवारी रात्री मोबाईलवर बोलत पायी घरी जात होती. एमएच ३१/ एएच १८६३ क्रमांकाच्या मोटरसायकलवर बसलेल्या दोन लुटारूंनी दिव्याचा मोबाईल तसेच तिच्या हातातील पर्स हिसकावून पळ काढला. या पर्समध्ये १० हजार रुपये होते. तिच्या मोबाईलची किंमत ३० हजार आहे. दिव्याने आरडाओरड करून आजूबाजूच्यांचे लक्ष वेधले. मात्र, त्यांना घटना माहीत पडेपर्यंत आरोपी नजरेआड झाले होते. दिव्या हिच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला. मोटरसायकल क्रमांकाच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.-----