शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! रस्त्यात रुग्णवाहिकेतील डिझेल संपले, कुटुंबीयांनी 1 किमी धक्का दिला, रुग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 19:57 IST

रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी 1 किलोमीटर धक्का मारला. हतबल कुटुंबाने रुग्णवाहिका चालकाकडे मदतीसाठी हात पसरले आणि दुसरी रुग्णवाहिका बोलवण्यास सांगितले.

राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका आजारी रुग्णाला जिल्हा रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेतील डिझेल रस्त्यातच संपल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक बाईकने डिझेल घेऊन मदतीसाठी तेथे पोहोचले. मात्र रुग्णवाहिका सुरू झाली नाही. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी 1 किलोमीटर धक्का मारला. हतबल कुटुंबाने रुग्णवाहिका चालकाकडे मदतीसाठी हात पसरले आणि दुसरी रुग्णवाहिका बोलवण्यास सांगितले. त्यानंतर 40 मिनिटांनी दुसरी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. 

दुसरी रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन रुग्णालयात पोहोचली मात्र तोपर्यंत रुग्णाने आपला जीव सोडला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील भीषण वैद्यकीय व्यवस्था दाखवणारे हे प्रकरण दोन दिवसांपूर्वी घडले आहे. बांसवाड्याला लागून असलेल्या प्रतापगड जिल्ह्यातील सेलिया भागातील सूरजपुरा येथील तेजपाल गणवा (40) हे आपल्या मुलीच्या सासरी भानुपारा (घोडी तेजपूर) येथे आले होते. सुमारे तीन दिवस ते मुलगी आणि नातवासोबत येथे राहिले. दरम्यान, 23 नोव्हेंबर रोजी तेजपाल शेतात उभे असताना खाली पडले. तेजपाल यांच्या मुलीने पती मुकेश मैदा यांना याबाबत माहिती दिली. 

तासाभरानंतर आली पहिली रुग्णवाहिका 

रुग्णवाहिकेसाठी प्रथम त्यांनी 108 क्रमांकावर कॉल केला आणि स्वत: बाईक घेऊन घराकडे निघाले. सकाळी 11 वाजता घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच मुकेश 12 वाजता त्याच्या गावी पोहोचले होते. पण तासाभरानंतर रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिका प्रथम घोरी तेजपूर PHC येथे पोहोचली. तेथे ईसीजी मशीन नसल्याचे कारण देत कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना छोटी सरवण सीएचसीमध्ये जाण्यास सांगितले. मात्र कुटुंबीयांनी रुग्णाला थेट जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. रतलाम रोडवरील टोलनाक्यासमोर संपले डिझेल 

रुग्णाला घेऊन रतलाम रोडवरील टोलनाक्यासमोर रुग्णवाहिका पोहोचली आणि बंद झाली. डिझेल संपल्याच समजलं. रुग्णवाहिकेच्या चालकाने बाईकवरून डिझेल आणण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाला 500 रुपये दिले. डिझेल आणूनही रुग्णवाहिका सुरू झाली नाही. यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी सुमारे एक किलोमीटरपर्यंत धक्का देऊन रुग्णवाहिका सुरू करण्याचा प्रयत्न केला. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून रुग्णवाहिका चालकाने दुसरी रुग्णवाहिका बोलावली. मात्र ती रुग्णाला घेऊन रुग्णालयात पोहोचली तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"