आंबेली उपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Updated: August 26, 2015 00:18 IST2015-08-26T00:18:58+5:302015-08-26T00:18:58+5:30
मडगाव : आंबेली स्पोर्ट्स क्लब संघाने वेर्णा स्पोर्ट्स क्लब संघाचा 2-0 ने पराभव केला. याबरोबरच त्यांनी कुंकळ्ळी युनियन स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित यारी प्रीमियर चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

आंबेली उपांत्यपूर्व फेरीत
म गाव : आंबेली स्पोर्ट्स क्लब संघाने वेर्णा स्पोर्ट्स क्लब संघाचा 2-0 ने पराभव केला. याबरोबरच त्यांनी कुंकळ्ळी युनियन स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित यारी प्रीमियर चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा कुंकळ्ळी येथील सरकारी शाळेच्या मैदानावर खेळविण्यात येत आहे. या एकतर्फी सामन्यात जेड कुलासो व नियाल कादरेज यांनी गोल नोंदवले. 12 व्या मिनिटाला जेड कुलासोने मायकलकडून मिळालेल्या पासवर पहिल्या गोलाची नोंद केली. तर या सत्रात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आणखी गोल करण्याच्या संधी गमावल्या. यात आंबेलीच्या सॅमसन व जेड कुलासो व वेर्णाच्या जॉनी यांचा समावेश आहे.दुसर्या सत्रातही आंबेलीच्याच संघाने खेळावर वर्चस्व राखले. या वेळी संघासाठी दुसरा गोल 57 व्या मिनिटाला नियाल कादरेजने अरविंद फर्नांडिसच्या पासवर नोंदविला. त्यानंतर वेर्णाच्या संघाकडून गोल करण्याचे अनेक प्रय} करण्यात आले होते. मात्र, आंबेली संघाच्या बचावफळीने तसेच गोलरक्षकाने त्यांचे प्रय} वाया घालविले.आजचा सामना: युनायटेड क्लब ऑफ बाणावली विरुध्द युनियन ऑफ चिंचणी व्हिलेर्जस.