ज्युनिअर अंबानीचं नामकरण; जाणून घ्या, आपल्या नातवाला काय नावानं बोलावणार मुकेश-नीता अंबानी

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 24, 2020 09:19 PM2020-12-24T21:19:57+5:302020-12-24T21:23:02+5:30

गेल्या 10 डिसेंबरला अंबानी कुटुंबात या नव्या पाहुन्याचे आगमण झाले. यानंतर, अंबानी कुटुंबीयांनी भगवान श्रीकृष्णाच्या कृपाशिर्वादाने श्लोका आणि आकाश अंबानी यांना मुलगा झाल्याची घोषणा केली होती.

Ambani family reveals the name of Akash-Shloka son and Mukesh Ambani grandson | ज्युनिअर अंबानीचं नामकरण; जाणून घ्या, आपल्या नातवाला काय नावानं बोलावणार मुकेश-नीता अंबानी

ज्युनिअर अंबानीचं नामकरण; जाणून घ्या, आपल्या नातवाला काय नावानं बोलावणार मुकेश-नीता अंबानी

Next
ठळक मुद्देगेल्या 10 डिसेंबरला अंबानी कुटुंबात या नव्या पाहुन्याचे आगमण झाले.या बाळाचे नाव 'पृथ्वी' असे ठेवण्यात आले आहे.अंबानी कुटुंबात आकाश हे नाव आधीच असल्यामुळे या चिमुकल्याचे नाव पृथ्वी, असे ठेवण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. 


मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी तथा नीता अंबानी यांच्या नातवाचे नामकरण करण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश आणि त्याची पत्नी श्लोका मेहता यांनी आपल्या बाळाच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. या बाळाचे नाव 'पृथ्वी' असे ठेवण्यात आले आहे.

गेल्या 10 डिसेंबरला अंबानी कुटुंबात या नव्या पाहुन्याचे आगमण झाले. यानंतर, अंबानी कुटुंबीयांनी भगवान श्रीकृष्णाच्या कृपाशिर्वादाने श्लोका आणि आकाश अंबानी यांना मुलगा झाल्याची घोषणा केली होती. अंबानी कुटुंबात आकाश हे नाव आधीच असल्यामुळे या चिमुकल्याचे नाव पृथ्वी, असे ठेवण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. 

पणजीकडून नावाची घोषणा
‘भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने, धीरुभाई अंबानी यांच्या आशीर्वादांनी कोकिलाबेन अंबानी यांना पृथ्वी आकाश अंबानीच्या जन्माची घोषणा करताना आनंद होत आहे. बाळाचे आई बाबा श्लोका आणि आकाशही आनंदी आहेत. बाळाच्या नावाची घोषणा करताना आजी आजोबा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी तसेच मोना आणि रसेल मेहता अत्यंत खुश आहेत’ असे अंबानी कुटुंबातर्फे बाळाचे नाव जाहीर करताना म्हणण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी, या आपल्या नातवासोबतचा मुकेश अंबानी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्युनिअर अंबानीच्या आगमनानंतर त्यांच्या अँटिलिया निवासस्थानी निळ्या रंगाची रोषणाईही करण्यात आली होती.

Web Title: Ambani family reveals the name of Akash-Shloka son and Mukesh Ambani grandson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.