अंबानी बंधूंची विदेशात बँक खाती
By Admin | Updated: October 28, 2014 02:07 IST2014-10-28T02:07:17+5:302014-10-28T02:07:17+5:30
केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी विदेशात काळा पैसा असलेल्या 15 जणांची यादी जारी केली, त्यात मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.

अंबानी बंधूंची विदेशात बँक खाती
नवी दिल्ली : रालोआ सरकारने काळा पैसा असलेल्या केवळ तीन उद्योगपतींची नावे उघड करीत उर्वरित बडय़ा उद्योजकांना वाचविण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. येथे एका पत्रपरिषदेत केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी विदेशात काळा पैसा असलेल्या 15 जणांची यादी जारी केली, त्यात मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे. या दोन्ही बंधूंकडे रिलायन्स समूहाचे साम्राज्य असून त्यांची माता कोकिलाबेन, ज्येष्ठ अधिकारी संदीप टंडन त्यांच्या पत्नी उन्नावच्या माजी खासदार अन्नू टंडन, मॉटेक सॉफ्टवेअर प्रा.लि.(रिलायन्स समूहाची कंपनी), जेट एअरवेजचे मालक नरेशकुमार गोयल, डाबर उद्योग समूहाचे मालक बर्मन कुटुंबातील तीन बंधू तसेच यशोधरा बिर्ला यांच्या नावाचा समावेश आहे. मुंबईत शनिवारी झालेल्या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर हात ठेवला होता, त्यावरून त्यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत ते लक्षात येते. अनिल अंबानी यांना मोदींनी स्वच्छ भारत मोहिमेत सहभागाचे आवाहन केलेल्या खास नऊ निमंत्रितांमध्ये स्थान आहे. त्यामुळे निश्चितच त्यासंबंधी तपासावर प्रभाव पडेल, असे केजरीवाल म्हणाले.
उर्वरित नावे कुठे गेली?
दोन वर्षापूर्वी आम्ही जारी केलेल्या यादीतही सरकारने जाहीर केलेली तीन नावे होती. उर्वरित नावे कुठे गेली? आम्ही नमूद केलेली नावे यादीत आहेत की नाही, त्याचे सरकारने स्पष्टीकरण द्यावे. या यादीतील काहींच्या निवासस्थानी सीबीआयने छापे घातले होते. बडय़ा उद्योगपतींची सरकारशीशी जवळीक पाहता तपास अधिका:यांनाही धमकावण्याचा प्रयत्न होईल, असेही केजरीवाल आणि भूषण यांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
संपुआ सरकारच्या भूमिकेपासूनही माघार : जेठमलानी
च्जर्मनीच्या लिचटेनस्टेन बँकेत भारतीयांनी साठविलेल्या बेहिशेबी मालमत्तेबाबत त्या देशाने पुरविलेली सर्व माहिती उघड करण्याची भूमिका यापूर्वीच्या संपुआ सरकारने घेतली होती. मोदींचे सरकार त्यापासूनही माघार घेत आहे, असा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केला.
च्जुलै 2क्11 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन संपुआ सरकारने एसआयटीची स्थापना करण्याबाबत निर्देश मागितले होते. रालोआने तर आता जर्मनीतील बँक खात्याच्या माहितीबाबत सुधारणा किंवा स्पष्टीकरणाची भूमिका अवलंबली आहे.
च्सरकारने या मुद्यावर विरोधकांना लक्ष्य बनवत राजकारण किंवा खळबळ उडवून देणारा डाव खेळू नये. याकडे व्यापक दृष्टिकोनातून बघावे. काँग्रेसची भूमिका स्पष्टच असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. ही राजकारण खेळण्याची वेळ नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले.