जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला, सात ठार

By Admin | Updated: July 10, 2017 23:17 IST2017-07-10T21:19:41+5:302017-07-10T23:17:56+5:30

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Amarnath yatris in Jammu and Kashmir, seven killed, seven killed | जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला, सात ठार

जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला, सात ठार

ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 10 -  जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता माजवणाऱ्या दहशतवाद्यांनी आज अमरनाथ यात्रेकरूंना आपले लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर केलेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला असून, १३ जण जखमी झाले आहेत. मृत यात्रेकरू हे गुजरातमधील वलसाड येथील राहणारे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बालटाल येथून जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सात भाविक ठार झाले असून, १३ जण जखमी झाले आहे. दहशतवाद्यांनी रात्री आठच्या सुमारास हा हल्ला केला. यात्रेकरूंनी बस थांबवल्याने ही बस सुरक्षारक्षकांच्या ताफ्यातून मागे राहिली. ही संधी साधत दहशतवाद्यांनी हल्ला केला. 
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जम्मू- श्रीनगर महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. भारतातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या अमरनाथ येथील यात्रेला २९ जूनपासून सुरुवात झाली होती.
 

Web Title: Amarnath yatris in Jammu and Kashmir, seven killed, seven killed