संततधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित
By Admin | Updated: July 11, 2015 00:35 IST2015-07-11T00:35:43+5:302015-07-11T00:35:43+5:30
राज्यात गुरुवार रात्रीपासून सुरूअसलेल्या संततधार पावसामुळे बालताल आणि पहलगाम मार्गांवर अमरनाथ यात्रा शुक्रवारी स्थगित करण्यात आली

संततधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित
श्रीनगर/जम्मू : राज्यात गुरुवार रात्रीपासून सुरूअसलेल्या संततधार पावसामुळे बालताल आणि पहलगाम मार्गांवर अमरनाथ यात्रा शुक्रवारी स्थगित करण्यात आली, तसेच जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरही ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प पडली असून अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या ६८ वाहनांसह २००० भाविक मध्येच अडकले आहेत.
दुसरीकडे सांबा जिल्ह्यातील पुरात अडकलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या २८ जवानांना वायुसेनेच्या विमानाने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पवित्र गुफेजवळचे हवामान ठीक असून हेलिकॉप्टर सेवाही सुरळीत सुरू आहे. दरम्यान, भाविकांची दहावी तुकडी कडेकोट सुरक्षेत अमरनाथ गुफेला रवाना झाली असून, यात २,४२२ भाविक आहेत.(वृत्तसंस्था)