अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ल्याची शक्यता
By Admin | Updated: July 23, 2014 02:56 IST2014-07-23T02:56:40+5:302014-07-23T02:56:40+5:30
अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला असल्याची माहिती गुप्तचर खात्याने दिली

अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ल्याची शक्यता
नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला असल्याची माहिती गुप्तचर खात्याने दिली असल्याचे गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेला सांगितले. दहशतवाद्यांचा अमरनाथ यात्रेला आपले लक्ष्य बनविण्याचा इरादा असल्याची माहिती केंद्र व राज्य पातळीवरच्या सुरक्षा यंत्रणांजवळ असल्याचे ते म्हणाले.
यावर्षी ही यात्र सुरू झाल्यानंतर गंदरबल जिल्ह्यात या यात्रेवर दगडफेक होण्याच्या घटना घडल्या असून यात एक यात्रेकरू जखमी झाला, तर तीन वाहनांच्या काचा तुटल्याची माहिती मिळाल्याचे रिजिजू पुढे म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)