शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

Amarnath Cloudburst: अमरनाथ गुहेजवळ पुन्हा ढगफुटी; 4 हजार भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 19:51 IST

Amarnath Cloudburst: यापूर्वी 8 जुलै रोजी अमरनाथच्या पवित्र गुहेजवळ ढगफुटी झाली होती. त्या घटनेत सुमारे 15 जणांचा मृत्यू झाला होता.

Amarnath Cloudburst: मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेवर असलेल्या भाविकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी अमरनाथ गुहेजवळ भीषण ढगफुटी झाल्याची घटना घडली होती. तशीच घटना आज परत एकदा घडली आहे. सध्या अमरनाथ परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल आलेल्या मुसळधार पावसामुळे, कालपासून आतापर्यंत सुमारे 4000 यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

8 जुलै रोजी ढग फुटलेआजच्या ढगफुटीच्या घटनेने दोन आठवड्यांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. 8 जुलै रोजी बाबा बर्फानीच्या पवित्र गुहेजवळ ढगफुटी झाली होती. या घटनेत सुमारे 15 जणांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलाच्या Mi-17 V5 आणि चीतल हेलिकॉप्टरद्वारे 34 जखमी यात्रेकरूंना बाहेर काढण्यात आले होते. तसेच, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत घेण्यात आली होती.

जम्मू येथून 2100 भाविकांची तुकडी रवाना जम्मूच्या भगवती नगर बेस कॅम्पमधून 2100 हून अधिक यात्रेकरूंची तुकडी मंगळवारी अमरनाथकडे रवाना झाली. सीआरपीएफच्या कडेकोट सुरक्षेत अमरनाथ यात्रेकरूंचा 26 गट मंगळवारी सकाळी 73 वाहनांच्या ताफ्यातून गुहेकडे निघाला. 26व्या तुकडीत एकूण 2,189 यात्रेकरूंचा समावेश आहे. 

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राRainपाऊस