शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑपरेशन पंजाब’मध्ये पक्ष श्रेष्ठींसमोर ३ पर्याय; अमरिंदर सिंग यांची समितीशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 06:45 IST

सोनिया गांधी यांच्यासमोर तीन पर्याय आहेत. मंत्रिमंडळ पुनर्रचना करण्यास सांगणे आणि नवज्योत सिंग सिद्ध आणि इतर बंडखोरांना त्यात सामावून घेणे. तसे झाल्यास तो बंडखोरांचा विजय समजला जाईल.

- व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी येथे तीन सदस्यांच्या समितीची भेट घेतल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे ‘ऑपरेशन पंजाब’ सुरू झाले. आता पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना राज्यात विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्य शाखेत समतोल राखण्याचे नाजूक काम करायचे आहे. सोनिया गांधी यांच्यासमोर तीन पर्याय आहेत. मंत्रिमंडळ पुनर्रचना करण्यास सांगणे आणि नवज्योत सिंग सिद्ध आणि इतर बंडखोरांना त्यात सामावून घेणे. तसे झाल्यास तो बंडखोरांचा विजय समजला जाईल. पंजाब प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांसह संघटनेत बदल घडवणे आणि सरकार आणि पक्ष यांच्यात उत्तम समन्वयासाठी समन्वय समिती स्थापन करणे. पंजाब प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुनील जाखर यांना बदलले जाऊ शकते. मात्र यासाठी अमरिंदर सिंग तयार नाहीत. ऑपरेशन पंजाबचा हेतू हा अमरिंदरसिंग यांचे अधिकार कापण्याचा असला तरी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांशी शत्रूत्व घेणे परवडणारे नाही. त्याचे उलट परिणाम होऊ शकतील. याचे कारण असे की, सिंग यांच्या राजकीय शत्रूंपैकी कोणीही कॅप्टन सिंग यांना वगळून निवडणूक जिंकून देऊ शकत नाही. पंजाबमध्ये हे विरोधक किंवा केंद्रीय नेतृत्व मते खेचू शकत नाहीत. मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष असलेल्या या तीन सदस्यांच्या समितीत जे. पी. अग्रवाल आणि हरीश रावत यांचा समावेश आहे. पक्षाच्या नेत्यांशी झालेली चर्चा आणि घडामोडींची माहिती समितीने राहुल गांधी यांना दिल्याचे बोलले जाते. समिती अहवाल दोन दिवसांत सोनिया गांधी यांना सादर करण्याची अपेक्षा आहे.महत्त्वाची पदे हवीतअमरिंदर सिंग हे शिराेमणी अकाली दल,  भाजप आणि आम आदमी पक्षाशी तसेच पक्षातील नाराजांशी लढत आहेत. या नाराजांना पक्ष श्रेष्ठींच्या पाठिंब्यामुळे महत्त्वाची पदे हवी आहेत. २०१९ पासून काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक हरतो आहे. तरी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये तो कनिष्ठ भागीदार म्हणून सत्तेत सहभागी आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस