अमरिंदरसिंग राजा ब्रार युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:02+5:302014-12-25T22:41:02+5:30

नवी दिल्ली-पंजाबमधील आमदार अमरिंदर सिंग राजा ब्रार यांची राष्ट्रीय युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी काँग्रेसने गुरुवारी नियुक्ती केली. संस्थात्मक फेरबदलाच्या धोरणान्वये माजी अध्यक्ष आमदार राजीव सातव यांच्या जागी ब्रार यांना नियुक्त केले आहे. पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ब्रार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांना तात्काळ नियुक्त केल्याचे सांगितले.

Amarinder Singh King Brar as the President of Youth Congress | अमरिंदरसिंग राजा ब्रार युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी

अमरिंदरसिंग राजा ब्रार युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी

ी दिल्ली-पंजाबमधील आमदार अमरिंदर सिंग राजा ब्रार यांची राष्ट्रीय युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी काँग्रेसने गुरुवारी नियुक्ती केली. संस्थात्मक फेरबदलाच्या धोरणान्वये माजी अध्यक्ष आमदार राजीव सातव यांच्या जागी ब्रार यांना नियुक्त केले आहे. पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ब्रार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांना तात्काळ नियुक्त केल्याचे सांगितले.
गिद्देरबहा मतदारसंघातील ३७ वर्षीय या आमदारांनी, पक्ष बांधणीसाठी मोठ्या प्रमाणावर युवकांना संघटित करण्यावर आपला भर राहणार असल्याचे सांगितले. तसेच भाजपाच्या केंद्रातील सरकारच्या अपयशाला समोर आणून त्याविरुद्ध निदर्शने करणे आणि अन्य कार्यक्रमही अग्रक्रमाने राबविण्यात येणार असल्याचे सांगून संघटनेत एक नवी जीवनपद्धती रुजविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. राहुल गांधींनी सुरू केलेल्या मतदान प्रक्रियेनुसार निवडून आलेले ते पहिले पदाधिकारी आहेत.
पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, गुरुदास कामत, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, रमेश चेन्नीथाला, मनीष तिवारी, रणदीप सुरजेवाला, अशोक तनवर यांनी युवा काँग्रेसचे अध्यक्षपद याआधी भूषविले आहे.
आपला व आपल्या कुटुंबाचा राजकारणाशी संबंध नसल्याचे सांगून ब्रार यांनी राहुल गांधींच्या मोहिमेमुळे आपण प्रेरित झाल्याचे म्हटले आहे.

Web Title: Amarinder Singh King Brar as the President of Youth Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.