अमर सिंग झाले 'भक्त', श्रीकृष्णासोबत केली मोदींची तुलना
By Admin | Updated: February 24, 2017 21:40 IST2017-02-24T21:38:54+5:302017-02-24T21:40:08+5:30
समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार अमर सिंग पक्षातून हकालपट्टी झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गुणगाण करण्याची कोणतीही संधी सोडत नाही

अमर सिंग झाले 'भक्त', श्रीकृष्णासोबत केली मोदींची तुलना
>ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 24 - समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार अमर सिंग पक्षातून हकालपट्टी झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गुणगाण करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. तर याउलट संधी मिळेल तसं ते समाजवादी पक्षावर टीका करताना दिसतात.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपण आझम खान आणि त्यांच्या समर्थकांचा सर्वनाश व्हावा अशी प्रार्थना केल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना भगवान श्रीकृष्णासोबत केली.
उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्रचारात विरोधक पंतप्रधान मोदींवर उपरे असल्याची टीका करतात या प्रश्नावर अमर सिंग म्हणाले, मथुरेमध्ये जन्मलेल्या श्रीकृष्णाची गुजराती बांधव द्वारकाधिश म्हणून पूजा करतात, मात्र गुजरातच्या मोदींनी विकास करण्यासाठी गुजरातसोडून उत्तर प्रदेशच्या वाराणसीची निवड केली तर विरोधक त्यामध्ये आडकाठी आणत आहेत.