शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: ...अन् हवेत गोल-गोल फिरलं भाजपा खासदाराचं हेलिकॉप्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 14:47 IST

 उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला

अलवर: राजस्थानच्या अलवरमध्ये आज एक मोठी दुर्घटना टळली. भाजपाचे खासदार महंत बालकनाथ यांच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यावर वाऱ्याच्या वेगामुळे ते गोल-गोल फिरू लागलं. मात्र पायलटनं समयसूचकता दाखवत परिस्थिती हाताळली. त्यानं योग्य वेळी हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होण्यापासून बचावलं. मात्र हे पाहताना उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.  भाजपाचे खासदार बालकनाथ त्यांच्या मतदारसंघातील कोट कासिम भागातील मंदिरात गेले होते. यानंतर ते हेलिकॉप्टरनं निघाले. मात्र हवेत काही फूट जाताच वाऱ्याच्या वेगामुळे त्यांचं हेलिकॉप्टर गोल-गोल फिरू लागलं. जमिनीपासून काही फूटांवर हेलिकॉप्टर अतिशय वेगात फिरत होतं. बालकनाथ यांचे कार्यकर्ते श्वास रोखून हा प्रकार पाहत होते. मात्र पायलटनं प्रसंगावधान राखत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. जमिनीपासून काही फूट अंतरावर खासदार बालकनाथ यांचं विमान गोल-गोल फिरत होतं. वाऱ्याचा वेग पाहता दुर्घटना घडण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे कार्यकर्ते श्वास रोखून हेलिकॉप्टरकडे पाहू लागले. आतापर्यंत अनेक नेत्यांनी विमान अपघातात जीव गमावला असल्यानं उपस्थित कार्यकर्त्यांना काळजी वाटू लागली. मात्र हेलिकॉप्टरच्या पायलटनं समयसूचकता दाखवल्यानं मोठा अनर्थ टळला. 

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थान