अलोक वर्मा होणार दिल्लीचे पोलीस आयुक्त

By Admin | Updated: February 17, 2016 20:59 IST2016-02-17T20:50:24+5:302016-02-17T20:59:39+5:30

वरिष्ठ आयपीएस अधिकारी अलोक वर्मा दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त होणार आहेत. १९७९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या अलोक वर्मा यांचे

Allok Verma will be the Delhi Police Commissioner | अलोक वर्मा होणार दिल्लीचे पोलीस आयुक्त

अलोक वर्मा होणार दिल्लीचे पोलीस आयुक्त

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ -  वरिष्ठ आयपीएस अधिकारी अलोक वर्मा दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त होणार आहेत. 
१९७९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या अलोक वर्मा यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. तसेच, सध्याचे दिल्ली पोलीस आयुक्त बी एस बस्सी येत्या २९ फेब्रुवारीला निवृत्त होत असून त्यांच्या जागी येत्या १ मार्चपासून दिल्ली पोलीस आयुक्तपदाची धुरा अलोक वर्मा सांभाऴणार आहेत. दिल्ली पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत अलोक वर्मा यांच्यासह १९८४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी धर्मेद्र कुमार यांचेही नाव चर्चेत होते.  
सध्या अलोक वर्मा तिहार जेलच्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत. 
 

Web Title: Allok Verma will be the Delhi Police Commissioner