बारावी फेरपरीक्षेचे अर्ज वाटप सुरू
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:38+5:302015-07-10T23:13:38+5:30
नवी मुंबई : बारावी फेरपरीक्षेच्या अर्ज वाटपास मंगळवारपासून सुरुवात झाली. यंदाच्या निकालाने गाठलेला उच्चांक पाहता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये नवी मुंबईतील एकूण १५५९, पनवेल तालुक्यामधील ४८१ तर उरण तालुक्यातील २१२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. हे फॉर्म महाविद्यालयात २० जुलैच्या आत सादर करायचे आहेत. २१ ते २८ जुलै दरम्यान सादर केलेल्या अर्जांना दंड लागू केले जाणार आहे. सर्वच महाविद्यालयांनी त्यांचे अर्ज ३० जुलैपर्यंत सादर करणे गरजेचे आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात फेरपरीक्षा होणार आहे.

बारावी फेरपरीक्षेचे अर्ज वाटप सुरू
न ी मुंबई : बारावी फेरपरीक्षेच्या अर्ज वाटपास मंगळवारपासून सुरुवात झाली. यंदाच्या निकालाने गाठलेला उच्चांक पाहता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये नवी मुंबईतील एकूण १५५९, पनवेल तालुक्यामधील ४८१ तर उरण तालुक्यातील २१२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. हे फॉर्म महाविद्यालयात २० जुलैच्या आत सादर करायचे आहेत. २१ ते २८ जुलै दरम्यान सादर केलेल्या अर्जांना दंड लागू केले जाणार आहे. सर्वच महाविद्यालयांनी त्यांचे अर्ज ३० जुलैपर्यंत सादर करणे गरजेचे आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात फेरपरीक्षा होणार आहे.