शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"युती केव्हाच झाली असती, उद्धव ठाकरेही तयार होते, पण..."; राहुल शेवाळेंनी युतीचा अणुबॉम्बच फोडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 19:16 IST

भाजपासोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे तयार होते. यासाठी दिल्लीत मोदींसोबत तासभर चर्चा देखील झाली होती, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला.

नवी दिल्ली-

शिवसेनेला राज्यात हादरा बसल्यानंतर दिल्लीतही १२ खासदारांनी आता शिंदे गटाला पाठिंबा देत वेगळी भूमिका घेतली आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या १२ खासदारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपली भूमिका मांडली. यावेळी शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे असल्याचं जाहीर करण्यात आलं. पक्षाची भूमिका मांडताना राहुल शेवाळे यांनी यावेळी मोठा गौप्यस्फोट केला. भाजपासोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे तयार होते. यासाठी दिल्लीत मोदींसोबत तासभर चर्चा देखील झाली होती, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला. ते दिल्लीत महाराष्ट्र सदनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

'उद्धव ठाकरेंनी युतीचे प्रयत्न करायला सांगितले म्हणूनच हा निर्णय', राहुल शेवाळेंचा मोठा गौप्यस्फोट!

"उद्धव ठाकरे जेव्हा दिल्लीत आलेले तेव्हा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत खास दालनात बैठक झाली होती. तेव्हा युतीवर तासभर चर्चा झाली होती. आतापर्यंत भाजपा-शिवसेना युतीबाबत चारवेळा चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरेंनाही युती हवी होती. जून महिन्यात मोदींसोबत बोलणी झाली आणि जुलैमध्ये राज्यात भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या घटनेवर भाजपाचेही पक्ष श्रेष्ठी नाराज झाले होते. एकीकडे आपल्यासोबत युतीची बोलणी होतेय आणि दुसरीकडे आमदारांवर कारवाई होतेय. यामुळे भाजपाच्या पक्ष नेतृत्वात नाराजी झाली. नाहीतर तेव्हाच युती झाली असती. या सर्व बाबींचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी आमच्यासमोर केला आहे", असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला. 

उद्धव ठाकरेंनीच युतीसाठी प्रयत्न करायला सांगितले!"कित्येक वेळा उद्धव ठाकरेंनी युतीची चर्चा केली. पण रिस्पॉन्स मिळाल नाही. या सर्व गोष्टी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितल्या. माझ्या परीने मी युतीचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही प्रयत्न करा, असं ते आम्हाला म्हणाले. मी स्वत: चार-पाच खासदारांना भेटलो. फडणवीस आणि शिंदेंना भेटलो. पण ज्या गोष्टींची पूर्तता करायची होती ती केली गेली नाही. त्यामुळेच आम्ही आज हा निर्णय घेतला आहे", असंही ते राहुल शेवाळे म्हणाले.

टॅग्स :Rahul Shewaleराहुल शेवाळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदी