शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसोबत युती अमान्य..!! जेडीएस उपाध्यक्ष सय्यद शफीउल्लांनी देवेगौडांकडे पाठवला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 19:49 IST

कर्नाटकातील जेडीएस-भाजपा युतीवर काहींची नाराजी

BJP alliance with JDS, Karnataka: कर्नाटकात JDS आणि भाजपा यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पण कर्नाटकातील काही JDS नेत्यांना भाजपसोबतची युती पसंत नसल्याचे दिसते. याच संदर्भात महत्त्वाची बाब म्हणजे आणखी एका अल्पसंख्याक नेत्याने पक्ष सोडला आहे. कर्नाटकात पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या तुमकुरू जिल्ह्यातील जेडीएस उपाध्यक्षांनी भाजपसोबतच्या युतीच्या निषेधार्थ बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाचे प्रमुख अल्पसंख्याक नेते एस. शफी अहमद यांनी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना व्हॉट्सअपवर राजीनामा पत्र पाठवले.

पक्ष सदस्य, उपाध्यक्ष पदाचा राजीनामा

आपल्या राजीनाम्यात अहमद यांनी म्हटले आहे की, मी JD(S) पक्षाचा आणि उपाध्यक्ष पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि जेडीएसमध्ये प्रवेश केला. मात्र त्याच्या पुढील वाटचालीबाबत सध्या तरी स्पष्टता नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाने भाजपशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर JD(S) पक्षाच्या अल्पसंख्याक नेत्यांनी बैठक घेतली. दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी.एम. इब्राहिम यांनी अद्याप या घडामोडीवर भाष्य केलेले नाही, परंतु सूत्रांनी दावा केला आहे की ते देखील पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत.

जनता दल (धर्मनिरपेक्ष) कर्नाटक युनिटचे उपाध्यक्ष सय्यद शफीउल्ला यांनी गेल्या शनिवारी भाजपा पक्षासोबतच्या युतीबद्दल नाराजी व्यक्त करत पक्षाचा राजीनामा दिला होता. 'भावी रणनीती'बाबत त्यांनी पक्षाच्या इतर मुस्लिम नेत्यांच्याही बैठका घेतल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, JD(S) चा राज्यातील मुस्लिम समुदायावर बऱ्यापैकी प्रभाव आहे. 

अनेक प्रसंगी मुस्लिम बांधवांनी काँग्रेसपेक्षा जेडीएसला निवडले आहे. मात्र, ही युती मुस्लिम समाजाला धक्का असल्याचे बोलले जात आहे. पक्षाचा जनाधार कमी होण्याची शक्यता आहे, असे काही राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. शफिउल्ला यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, "मी हे सांगू इच्छितो की मी समाज आणि समुदायाची सेवा करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत आणि पक्षाची सेवा केली आहे, कारण आमचा पक्ष धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवत होता आणि त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता.'

'इतर कोणताही पर्याय शिल्लक नाही'

ते म्हणाले की मी हे देखील नमूद करू इच्छितो की ज्या कालावधीत आमच्या पक्षाचे राज्य युनिट भाजपसोबत राज्य सरकार स्थापन करण्यासाठी सामील झाले त्या कालावधीसाठी मी पक्षाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाचे वरिष्ठ नेते आता भाजपशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेत असल्याने पक्षाच्या प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही.

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपा