सर्वांना प्रतीक्षा मतमोजणीची प्रशासनाकडून नियोजन : व्यवस्थेचा आढावा

By Admin | Updated: May 6, 2014 20:12 IST2014-05-06T20:12:51+5:302014-05-06T20:12:51+5:30

नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी फक्त दहा दिवसांचा अवधी शिल्लक आहे. कळमना मार्केटमध्ये मतमोजणीसाठी आवश्यक असणार्‍या सर्व यंत्रणेची तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असून मंगळवारी या व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला.

All waiting for the administration of the counting of votes: a review of the system | सर्वांना प्रतीक्षा मतमोजणीची प्रशासनाकडून नियोजन : व्यवस्थेचा आढावा

सर्वांना प्रतीक्षा मतमोजणीची प्रशासनाकडून नियोजन : व्यवस्थेचा आढावा

गपूर: लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी फक्त दहा दिवसांचा अवधी शिल्लक आहे. कळमना मार्केटमध्ये मतमोजणीसाठी आवश्यक असणार्‍या सर्व यंत्रणेची तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असून मंगळवारी या व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला.
१० एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. १६ मे रोजी कळमना मार्केटमध्ये मतमोजणी होणार आहे. अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलेली मतदान यंत्रे १६ तारखेला सकाळी ८ वाजता उघडली जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होत जाईल.
कळमना मार्केटमध्ये दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणीचे नियोजन आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक मतदारसंघात २० टेबल लावण्याचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. तो मान्य झाला तर ठिक अन्यथा १४ टेबल लावले जातील. मतममोजणीसाठी सरासरी १५०० अधिकारी व कर्मचार्‍यांची गरज आहे. राजपत्रित अधिकार्‍यांची यासाठी मदत घेतली जाणार आहे. मतमोजणी स्थळाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली आहे. सरासरी एक हजार जवानांची आवश्यकता आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये १८ तर रामटेकमध्ये मतदानाच्या २५ फेर्‍या होण्याचा अंदाज प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी पाच तासात निकाल जाहीर करण्याचे नियोजन केले आहे. मात्र नागपूर आणि रामटेक मतदारसंघात रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या लक्षात घेतली तर मतमोजणीला किंचित विलंब होऊ शकतो. प्रत्येक फेरीनिहाय माहिती आयोगाला कळविण्यात आल्यावर ती जाहीर केली जाणार आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक टेबलवर उमेदवारांचे प्रतिनिधिी, मतमोजणी कर्मचारी आणि सूक्ष्म निरीक्षकही उपस्थित राहणार आहे. मतांची अचूक बेरीज करण्यासाठी सांख्यिकी विभागातील कर्मचार्‍यांची मदत घेतली जाणार असून मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या नजर असणार आहे.
निवडणूक शाखेच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी मतमोजणी स्थळाला (कळमना मार्केट यार्ड) भेट दिली व तेथील व्यवस्थेची पाहणी केली. कर्मचार्‍यांच्या भोजनाची व्यवस्था, संपर्क यंत्रणा, माध्यम कक्ष, उमेदवार तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांची बसण्याची व्यवस्था याबाबतचा आढावा घेण्यात आला. सर्वांचे लक्ष १६ मे च्या मतमोजणीकडे लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: All waiting for the administration of the counting of votes: a review of the system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.