आसाममध्ये दहशतवादी संघटनेचे सर्व म्होरके अटकेत
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30
लष्कर आणि पोलिसांची संयुक्त मोहीम

आसाममध्ये दहशतवादी संघटनेचे सर्व म्होरके अटकेत
ल ्कर आणि पोलिसांची संयुक्त मोहीमगुवाहाटी- आसाममध्ये भारतीय सैन्य दलाचे जवान आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून कार्बी पीपल्स लिबरेशन टायगर्स (केपीएलटी) या दहशतवादी संघटनेच्या सर्व म्होरक्यांना शस्त्रसाठ्यासह अटक केली.गुप्त सूचनेच्या आधारे सेनेच्या रेड हॉर्न डिव्हिजनने आसाम पोलिसांच्या मदतीने गेल्या १४ फेब्रुवारीच्या रात्री केपीएलटीच्या जहाल दहशतवाद्यांविरुद्ध सर्वात मोठी मोहीम सुरू केली होती. याअंतर्गत १५ तारखेला सर्वप्रथम संघटनेचा स्वयंभू अर्थ सचिव, अंकेक्षक आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला रांगस्कोप गावात ताब्यात घेण्यात आले. या तीन दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री तापतजवळील आमरिंग वनक्षेत्रात दहशतवाद्यांचे एक मोठे तळ उद्ध्वस्त करण्यात जवानांना यश आले. याठिकाणी केपीएलटीचा कमांडर इन चीफ, डेप्युटी चीफ आणि एरिया कमांडरसह सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. हामरेन उपविभागातील लाचेंग भागात आणखी काही दहशतवादी दडून बसले असल्याचे त्यांच्याकडून कळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेना आणि पोलिसांनी तात्काळ या क्षेत्राची घेराबंदी केली. मंगळवारी एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला आणि जंगलाच्या दिशेने पळून गेले. उभय बाजूने सुमारे अर्धा तास चाललेल्या चकमकीनंतर आणखी पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेत अटक झालेल्या दहशतवाद्यांची संख्या १५ झाली आहे. लष्कराने ईशान्येकडील दहशतवाद्यांविरुद्धचे सर्वात यशस्वी अभियान असल्याचे म्हटले आहे. या अभियानाने केपीएलटीचा जवळपास सफाया झाला आहे,असा दावा लष्कराच्या सूत्रांनी केला.(वृत्तसंस्था)