‘त्या’ विमानातील सर्व प्रवाशांना मानले मृत
By Admin | Updated: September 16, 2016 01:27 IST2016-09-16T01:27:30+5:302016-09-16T01:27:30+5:30
एएन-३२ विमानातील सर्व २९ प्रवाशांना मृत मानले जात असल्याचे वायुदलाने त्यांच्या कुटुंबीयांना कळविले आहे. या अपघातग्रस्त विमानाचा अद्यापही शोध सुरू आहे

‘त्या’ विमानातील सर्व प्रवाशांना मानले मृत
नवी दिल्ली : एएन-३२ विमानातील सर्व २९ प्रवाशांना मृत मानले जात असल्याचे वायुदलाने त्यांच्या कुटुंबीयांना कळविले आहे. या अपघातग्रस्त विमानाचा अद्यापही शोध सुरू आहे. वायुदलाचे हे विमान २२ जुलै रोजी चेन्नईहून पोर्टब्लेअरला जाताना बेपत्ता झाले होते.
परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे करण्यात आलेली कोर्ट आॅफ इन्क्वायरी आणि अथक शोध आणि मदतकार्यानंतरचा निष्कर्ष पाहता या विमानातील कुणीही जिवंत असण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. वायुदलाने २४ आॅगस्ट रोजी मृतांच्या कुटुंबीयांना पाठविलेल्या पत्रात कोर्ट आॅफ इन्क्वायरीचा हवाला देत दु:खद निष्कर्ष कळविला आहे.