तामिळनाडूसह सर्व राज्यांचा जीएसटीला पाठिंबा- अरुण जेटली
By Admin | Updated: June 14, 2016 18:31 IST2016-06-14T18:31:12+5:302016-06-14T18:31:12+5:30
जीएसटी विधेयकाला सर्व राज्यांनी पाठिंबा दिला असून, तामिळनाडूनं काही आरक्षणाच्या मुद्द्यावर जीएसटी विधेयकाला सहमती दर्शवली

तामिळनाडूसह सर्व राज्यांचा जीएसटीला पाठिंबा- अरुण जेटली
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 14 - अनेक दिवसांपासून राज्यसभेत लटकलेल्या जीएसटी बिलाचा मार्ग मोकळा झाला आहे. जीएसटी विधेयकाला सर्व राज्यांनी पाठिंबा दिला असून, तामिळनाडूनं काही आरक्षणाच्या मुद्द्यावर जीएसटी विधेयकाला सहमती दर्शवली आहे. जीएसटी विधेयकात सुधारणा केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी ही घोषणा केली आहे. जीएसटी म्हणजेच गुड्स आणि सर्व्हिसेस या विधेयकाला कोणतीही मुदत नसतानाही सुधारणा करून आम्ही ते सादर केलं असल्याची माहिती यावेळी अरुण जेटलींनी दिली आहे.
1 एप्रिल 2016ला हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी काँग्रेसच्या विरोधामुळे ते मंजूर झालं नव्हतं. अरुण जेटलींनी या विधेयकाच्या संमतीसाठी पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेशसह 22 राज्यांसोबत बैठक घेतली होती. लोकसभेत मंजूर झालेलं विधेयक लवकरच राज्यसभेत मंजूर होईल, अशी आशा अरुण जेटलींनी व्यक्त केली आहे.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट होणार असून, लवकरच जीएसटी विधेयकाला मंजुरी मिळेल. यावेळी पंतप्रधान मोदी आणि जयललितांमध्ये कावेरीच्या पाणी समितीच्या मुद्द्यावरही चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते आहे.