शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 17:34 IST

राजधानी दिल्लीत बुधवारी रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.

Delhi Temperature : देशाची राजधानी दिल्लीत लोक उष्णतेने होरपळून निघाले आहेत. बुधवारी पारा ५२ अंशांच्या पुढे गेला आहे. दिल्लीत पारा ५० अंशांच्या पुढे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिल्लीत मंगळवारीही पारा ५० च्या जवळ पोहोचला होता. दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेची लाट आणि अतिउष्णतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र बुधवारी उष्णतेने कहर केला. दुपारी अडीच वाजता दिल्लीत ५२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.

दिल्लीत बुधवारी उष्णतेचे सर्व विक्रम मोडले गेले आहेत. पहिल्यांदाच दिल्लीत तापमान ५२ अंशांच्या पुढे गेलं. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीच्या मंगेशपूर भागात ५२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. मुंगेशपुरमध्ये बुधवारी दुपारी २.३० वाजता५२ अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. मंगेशपूरचे तापमान ५२.३ अंश सेल्सिअस असताना सरासरी तापमान ४५.८ अंश होते. यामुळे दिल्लीतील नागरिकांना आपण भट्टीत राहतोय की काय असा अनुभव आला.

दुसरीकडे, हवामान खात्याने बुधवारी  सांगितले की, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेची परिस्थिती ३० मे पासून हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. ३१ मे रोजी पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्लीच्या काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यासोबत १ जून रोजी पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :delhiदिल्लीTemperatureतापमानHeat Strokeउष्माघातmonsoonमोसमी पाऊस